गोंदिया-तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, ह्रुदयरोग,मधुमेह, मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या 2004 च्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो हे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.तसेच क्षयरोगाचा वाढता प्रसार बघता प्रतिबंधात्मक उपाययोजना लोकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.त्यामुळे दि.26 जानेवारी 2025 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनी तंबाखु मुक्ती, क्षयरोग जनजागृती शपथ तसेच स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 अंतर्गत कुष्ठरोग आजाराबाबत जनजागृती करण्याचे केंद्र् शासनाने ठरविले आहे.
वरील तिन्ही बाबीची आवश्यकता बघता जिल्हा परिषद प्रशासनाने दि. 26 जानेवारी रोजी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यालयात समस्त अधिकारी व कर्मचारी वर्गाने तंबाखु मुक्ती, क्षयरोग जनजागृती व कुष्ठरोग प्रतिज्ञा घेतली.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर,उपाध्यक्ष सुरेश हर्षे,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे,वित्त व बांधकाम सभापती संजय टेंभरे,समाज कल्याण विभागाचे सभापती श्रीमती पुजा अखिलेश सेठ,पशुसंवर्धन विभाग सभापती सोनुभाऊ कुथे,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर,प्रकल्प संचालक प्रमिला जाखळेकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे,बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकुमार कटरे,आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,कृषी विकास विभागाचे कृषी विकास अधिकारी महेंद्रकुमार मडामे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) सुधिर महामुनी, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) डॉ.महेंद्र गजभिये,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे,लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे आंनदराव पिंगळे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात,विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांचे समवेत जिल्हा परीषदेतील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.
“कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करुया”
तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थ जसे जर्दा, खर्रा,बिडी, सिगारेट व हुक्का इत्यादी सेवन करण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढत चालेले आहे.त्यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये उच्च रक्तदाब,मधुमेह,कर्करोग, ह्रुदयरोग,पक्षघात,अर्धांगवायू यासारखे आजार बळावु लागलेले आहे.डोक्यांच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तंबाखूचे दुष्परिणाम दिसून येतात.त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, शासकीय कार्यालय,ग्रामपंचायत यांनी तंबाखूमुक्त गाव,नगर व परिसर यांनी तंबाखु मुक्तीची संकल्प करुन चळवळ निर्माण करण्याची गरजेचे झाले आहे.प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्व:तापासुन तंबाखुसारखे व्यसन सोडणे आवश्यक आहे.
– लायकराम भेंडारकर,अध्यक्ष,जिल्हा परिषद गोंदिया
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असुन टिबी आजाराबाबत योग्य ज्ञान वाढ्वुन टिबीशी भेदभाव न करता कंलक व गैरसमज दुर करावे.प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व क्षयरुग्णांना सामाजिक संस्था,सन्माननीय व्यक्ती यांनी दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार किट देण्याबाबत आवाहन केले.
-एम.मुरुगानंथम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया
कुष्ठरोगाचे व्यक्तीला आरोग्य केंद्रामध्ये प्रेरित करुन उपचार मिळण्याबाबत सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर त्याचे सोबत बसणे,खाणे,फिरणे याबत कुठलाही प्रकारचा भेदभाव न करता सापत्न वागणुक दिली पाहीजे.कुष्ठरोग पिडीत व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वांनी नेहमी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.सुरेश हर्षे उपाध्यक्ष,जिल्हा परिषद गोंदिया