
गोंदिया,दि.२९ :सडक अर्जुनी तालुक्यातून जात असलेल्या कोहमारा-नवेगावबांध-वडसा राज्यमार्गावरील कोकणा-खोबा गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना आज २९ जानेवारीला सायकांळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यानी घटनास्थळी दाखल होत मृत बिबट्याला ताब्यात घेतले.वन विभागाच्या अधिकार्यांच्या माहितीनुसार मृत बिबट्याचे वय अंदाजे २ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.