मराठीतून शिक्षण देणाऱ्या शासकीय शाळां वाचविणे गरजेचे – प्रा. डॉ. दिशा गेडाम

0
89

*गोंदिया* :- ” शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला कामकाजी भाषेमध्ये स्थान दिलं होत तसेच संत ज्ञानेश्वर, मुकुंदराज कवी कुसुमाग्रज, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचं मराठी भाषा विकासात फार मोठे योगदान आहे. संविधानाच्या 8व्या परिशिष्ट मध्ये भाषेचे महत्व सांगितले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असला तरी जमिनी स्तरावर मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता शिक्षण व शाळा हे पोषक माध्यम आहे. आधुनिक काळात खाजगी शाळांमध्ये अन्य भाषांना अधिक महत्व दिले जाते. गाव पाड्यातील शासकीय शाळा आजही मराठी भाषेचा सन्मान कायम ठेवत विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण देत आहेत. त्या शासकीय शाळा बंद करण्याऐवजी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्ह्यात संविधान जागृती अभियान चालविणाऱ्या सर्वसमाज विचारमंच अध्यक्ष व एस.एस गर्ल्स ज्यू. कॉलेज येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्हा वकील संघ यांच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात केले.

या प्रसंगी अतिथी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दिशा गेडाम यांच्यासह मंचावर अरविंद टी. वानखेडे (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया), ए.एस. प्रतिनिधी ( जिल्हा न्यायाधीश -1, तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया) , एन.डी.खोसे (जिल्हा न्यायाधीश -3, तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया), एन.के. वाळके.(सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया) प्रामुख्याने उपस्थित होते.
मंचावरून बोलताना न्यायाधिश प्रतिनिधी यांनी “मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे देवनागरी लिपी.. या लिपीतून आम्ही जगातील कोणतीही भाषा लिहून काढू शकतो किंवा या भाषेतून वाचून बोलू शकतो असे सांगितले”.कर्मचारी वर्गातून संजय बिसेन यांनी कविता सादर केली तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुचिता लडे यांनी केले.
संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 ते दि. 28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. अभिजात भाषाचा दर्जा मराठीला प्राप्त झालेला असून आता 2 मराठी विद्यापीठ राहतील , सरकार तर्फे 500 कोटी रुपये खर्च केले जातील, दरवर्षी मराठी साहित्य सम्मेलन होतील , मराठी विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला आतंरराष्ट्रीय स्थळावर पुरस्कृत केले जाणार. अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली.