- जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा आयोजीत
गोंदिया,दि.31 : लहान बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटामध्ये लसीकरण केल्यास रोगाविरूध्द लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण होते. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण प्रभावीपणे राबविल्यास बालमृत्यु व कुपोषण रोखण्यास लसीकरण हे प्रभावी साधन ठरेल असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी व्यक्त केले.
नियमित लसीकरण बाबतची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम व निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातील नियमित लसीकरण बाबतचे सादरीकरण जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा आयोजीत करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, जिल्हास्तरीय समिती सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ डॉ.लिना धांडे,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवन राऊत,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,बीजीडब्ल्यु रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ.सचिन उईके,वैद्यकिय अधिकारी डॉ.सलील पाटील,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,तसेच डॉ.संगिता भोयर,डॉ.प्रणित पाटील,डॉ.ललित कुकडे,डॉ.विनोद चव्हाण,डॉ.निलेश जाधव,डॉ.कविश्वर किरसान,डॉ.अमित खोडनकर ई.तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.साहेबलाल पारधी, डॉ.राहुल शेंडे, डॉ.नंदा गेडाम,डॉ.संजय माहुले,डॉ.एम.एस.राऊत,डॉ.गगन गुप्ता ई.ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, डॉ.अनिल आटे,आयएमए चे सचिव डॉ.ओम बघेले,डॉ.विकास विंचुरकर तसेच शासकीय कार्यालयाचे व अशासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. गावपातळीवरील अतिजोखमीचे गाव, पाडे, विटाभट्टी, जंगलव्याप्त गावात लसीकरण सत्राचे आयोजन करुन बालकांना सरंक्षित करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या.
नागरिकांनी जबाबदारीने आपल्या बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावी. नागरिकांनी बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करुन घ्यावे. तसेच बाळाला जन्मतः स्तनपान व बिसीजी, पोलिओ, हिपॅटायटीस-बी,व्हिटँमिन-के चे पंचःसुत्री लसीकरण देवुन कवच कुंडले प्रदान करण्याचे आवाहन एम.मुरुगानंथम यांनी या प्रसंगी केले.
डॉ.रोशन राऊत यांनी प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्यात येत असुन खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण सुद्धा अवश्य करुन घेण्याचे सांगितले.
जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ,पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही, आयपीव्ही, गोवर-रुबेला, जेई, डिपीटी, व्हिटँमिन-अ डोज ई. विविध लसीकरण मोफत दिले जात आहे. जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन बालकांना लसिकरण करण्यात येत आहे.जागृत राहुन पालकांनी आपल्या बालकास वयोगटातील सर्व लसीकरण करुन बालकाच्या शरीरात विविध आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण करावी तसेच कुपोषण व बालमृत्यु रोखण्यासाठी नियमित लसीकरण वेळेत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.