गोंदिया,दि.०६ः-गोंदिया व गोरेगााव तालुक्यातील ग्रामपंचायत तसेच पोलीस ठाणे,बालन्याय मंडळ,विधी महाविद्यालय,दवाखाने व इतर कार्यालयाच्या ठिकाणी निशुल्क विधी सहायय्ता व विधिविषयक सेवा पुरविण्याकरीता विधी सेवा सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदियाच्या मार्गदर्शनात या केंद्राची स्थापना करण्यात आली असून ३ फेबुवारी २५ पासून एक वर्षाच्या कालावधीकरीता यातील स्वयसेंवक,अधिकार मित्र,वकिल व न्यायरक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.या केंद्रांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विधी सेवा केंंद्राकरीता पॅनलनिहाय नियुक्त सर्वांनी संबधित ठिकाणी नेमुण दिलेल्या दिवशी विधी सेवा केंद्रात न चुकता हजर रहावे अशा सुचना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आले आहे.सोबतच यामध्ये सेवा देणार्यांना मानधन सुध्दा दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. गोंंदिया येथील नमाद विधी महाविद्यालय,नगर पंचायत गोरेगाव,पोलीस ठाणे गोंदिया शहर,रामनगर,गोंदिया ग्रामीण,गोरेगाव,रावणवाडी,गंगााझरी,दवनीवाडा तर ग्रामपंचायत कार्यालय कुडवा,कुर्हाडी,कवलेवाडा,एकोडी, दासगाव,काटी,कामठा,धापेवाडा येथे विधी सेवा केंद्राकरीता नियुक्त स्वयसेंवक,अधिकार मित्र व वकिलाकरीता संबधित ठिकाणी बसण्याची सोय करुन देण्यात यावे अशा सुचनाही देण्यात आलेल्या आहेत.यामध्ये गोंदिया जिल्हा परिषद येथे अधिकार मित्र व स्वयंसेवक म्हणून नारायणप्रसाद जमईवार हे सोमवार व मंगळवार उपस्थित राहणार आहेत.गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ट्विंकल दुबे,कुर्हाडी ग्रामपंचायत येथे नाहिद मुबारक शेख,कवलेवाडा येथे आशा मुकेश कुंभरे ठरवलेल्या दिवशी उपस्थित राहून निशुल्क विधीविषयक माहिती देणार आहेत.