33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ शिवसेना ठाकरे गटाने फेकला मंत्री दादा भुसेंच्या ताफ्यावर कापूस

शिवसेना ठाकरे गटाने फेकला मंत्री दादा भुसेंच्या ताफ्यावर कापूस

0
55

blank

अमरावती : सोयाबीन, तूरीसह शेतमालाला भाव मिळावा, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यादरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनांच्या दिशेने तूर आणि कापूस फेकला.ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचून ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे हे कार्यकर्त्यांस जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत शिरले. त्यांनी सोबत सोयाबीन, तूर आणि कपाशी आणली होती. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर तूर, कापूस फेकण्यात आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.सरकारची धोरणे ही शेतकरी विरोधी आहेत. बाजारात शेतमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत विकला जात असताना भाजपचे आमदार गप्प आहेत. सरकारला आता या बाबींवर जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

blank