शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात यावे;आमदार बडोलेंना शेतकऱ्यांचे निवेदन

0
154

सडक अर्जुनी:–तालुक्यातील शेतीला पाणी सिंचनासाठी महावितरण कंपनीकडून शेतीसाठी शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करण्यात येत होता.पण मागिल १० वर्षांपासून कधी ८ तास तर कधी १२ तास तास वीजपुरवठा करण्यात येते.त्यातूनही महिन्यातून कित्येक वेळा काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येते.त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री बेरात्री धोका पत्करून शेतात जावे लागते.आतातर ८ तास वीजपुरवठा करण्यात येईल असे फर्मान काढले आहे.तेही रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा करण्यात येईल असे फर्मान काढले आहे.शेतीला दिवसा २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी वांगी, चिंगी,बोळदे,कोकणा जमीनदार,कोकणा गोसाई,खोबा हलबी,खोबा गोंडी,कनेरी राम,मशेरी,कोसमघाट, बकी ,मेंढकी या गावातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांना लेखी निवेदन देऊन समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.या गावातील शेतक-यांची शेती व्याघ्र प्रकल्प नवेगावबांध अंतर्गत असून व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे.त्यामुळे या परिसरात हिंस्र प्राण्यांपासून जिवास धोका असल्याने येथील शेतकऱ्यांनी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन देऊन त्वरीत निराकरण करण्याची मागणी केली.माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी सर्व शेतकऱ्यांसमोर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना रात्रीला वीजपुरवठा न करता व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या गावांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा.असे निर्देश दिले.अधिका-यांनी आमदार बडोले यांचे म्हणणे ऐकून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांना लक्ष्मीकांत धनगाये,धनराज आसटकर,मुकेश कापगते, चिरंजीव रंगारी, मोरेश्वर डोंगरे,मंगेश डोंगरवार, मनोजकुमार शहारे, ज्ञानेश्वर मेश्राम,प्रितमकुमार लाळे,के.ए.रंगारी, धनराज चौधरी, ज्ञानेश्वर रहिले, पुरुषोत्तम डोंगरवार, कैलास जाळे, युवराज भेंडारकर, केशव चुटे, मनोहर मेश्राम, वसंत कापगते, प्रकाश डोंगरवार,गुलाब जुगनाके, जितेंद्र कापगते, देवदास डोंगरवार, सुनिल कापगते,अक्षय कापगते, किशोर डोंगरवार,तुळशिदास डोंगरवार,छोटेलाल मेश्राम हेमकृष्ण डोंगरवार यांनी दिले.