=पत्रकारिता,शिक्षण, कला,कृषी साहित्य,आरोग्य ईत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान
अर्जुनी मोर.-जुने जनसंघाचे कार्यकर्ते म्हणुन आपल्या कार्यकाळात स्व.शामरावबापु कापगते यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला.आणी शेवटपर्यंत तो टिकून राहावा आणी त्या माध्यमातुन समाजातील सर्व घटकांची सेवा करण्यातच धन्यता मानली.तोच वसा कायम टिकून रहावा व स्व.शामरावबापुंचे कार्य जनमानसात अविरत स्मरणात रहावे यासाठी स्व.शामरावबापु कापगते स्मृती प्रतिष्ठान स्कोलीच्या माध्यमातून गेल्या 37 वर्षापासून हे कार्य प्रतिष्ठान राबवीत असल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. स्व.शामरावबापुचे सामाजीक कार्य ,गोरगरीबांची सेवा हे कार्य सर्वच घटकांसाठी सदैव प्रेरणादायीच ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
स्व.माजी आमदार शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोली जि.भडारा यांच्या वतीने स्व.शामरावबापू यांच्या पुण्यतिथि निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन( ता.6 ) सन्मान करण्यात आला. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून बडोले बोलत होते.
पुरस्कार वितरण सोहळा अर्जुनी/मोरगाव येथील स्थानिक प्रसन्न सभागृहात 06 फेब्रुवारी रोजी पार पडला.यावेळी हरिभक्त परायण प्रशांत ठाकरे महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दैनिक हितवादचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधि अपूर्व मेठी,तरुण भारतचे अर्जुनी/मोरगाव तालुका प्रतिनिधि सुरेंद्रकुमार ठवरे यांना पत्रकारिता पुरस्कार, महिलांसाठी काम करणाऱ्या गोंदियाच्या समाजसेविका सौ.भावना दीपक कदम यांना मातोश्री महिला पुरस्कार, कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कवलेवाडाच्या सौ.योगिता दिनेश मौजे,इतर व्यवसायांसह कृषी क्षेत्रात आपली छाप पाडणारे अर्जुनी/मोरगावचे दादा फुंडे यांना कृषीरत्न पुरस्कार,वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची प्रामाणिक पणे सेवा करणारे नवेगाव/बांध चे डॉ.अभिमन कापगते यांना वैद्यकीय पुरस्कार,साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दूधबुरे,युवकांसाठी काम करणारे लाखनीचे हेमंत ब्राह्मणकर यांना युवा पुरस्कार,अंग मेहनत करून कुटुंबाचं पालन पोषण करणारे जयदेव टेंभुर्णे यांना श्रमिक पुरस्कार तर शिक्षण क्षेत्रात उत्तमकार्य करणारे शिक्षक नरेंद्र बनकर यांचेसह भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते व इत्यादींना माजी आमदार केशवराव मानकर,जेष्ठ प्रचारक प्रशांत हरताळकर विश्व मांगल्य सभा,माजी मंत्री आमदार ईंजि.राजकुमार बडोले, पद्मश्री परसराम खुणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य निना पिसे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे,पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते,तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,स्व.शामरावबापु कापगते स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.गजानन डोंगरवार,माजी प्राचार्य होमराज कापगते,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, भाजपचे तालुका अध्यक्ष विजय कापगते, नगराध्यक्षा मंजूषा बारसागडे,उपाध्यक्ष ललिता टेंभरे,जि प सदस्या रचनाताई गहाणे,जि प माजी सभापती प्रकाश गहाणे,जि प सदस्या जयश्री देशमुख,पंचायत समिती सदस्य डॉ.नाजुक कुंभरे,एड.मनीष कापगते,माजी सरपंच कुंदा डोंगरवार यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थितीत होते.
डाॅ.गजानन डोंगरवार यांनी प्रास्ताविकातुन या पुरस्कार वितरण सोहळ्यामागची भुमिका विशद केली.संचालन राधाबाई लोथे यांनी तर उपस्थितांचे आभार डाॅ.मनिष कापगते यांनी मानले.