संत रोहिदास महाराजांच्या विचारांनी समता नांदेल-भेंडारकर

0
30

अर्जुनी मोरगाव-चौदाव्या शतकात जन्मलेल्या संत रोहिदासांनी मांडलेले समतेचे विचार आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.संत मालिकेत त्यांना महत्वाचे स्थान आहे.शिखांचे धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यामध्ये रोहिदासांचे विचार अजरामर आहेत.भारतीय इतिहास आणि साहित्यात संत रविदासांचे महत्वाचे स्थान आहे.

समाजाच्या बऱ्याच मोठ्या घटकावर जातीच्या नावाखाली हजारो वर्षे अन्याय झाला. अशा सर्व समाजांच्या उद्धारासाठी संत रविदास महाराजांनी काम केले. त्यांना स्वतः देखील या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा लागला. शोषित-पीडित-वंचित-दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले.स्वातंत्र्य,सामाजिक न्याय,सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव हा विचार दिला. समाजातील चुकीच्या परंपरांबद्दल त्यांनी आपल्या लेखनातून कणखर टीका केली. समाज जागृतीसाठी त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले.समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये,माणसा मानसात भेदाभेद होऊ नये म्हणून त्यांनी सामाजिक न्याय, समतेचा संदेश दिला.संत रोहिदासांच्या विचारांनी जगात समता नांदेल असे विचार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.

ते येथील लक्ष्मी राईस मिल परिसरात आयोजित संत रोहिदास यांच्या जयंती सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जि.प. सभापती पोर्णिमा ढेंगे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे,जीपचे माजी उपाध्यक्ष यशवंत गणवीर,न.पं.सभापती राधेश्याम भेंडारकर,नगरसेवक यशकुमार शहारे,दानेश साखरे,अतुल बनसोड, डॉ.भारत लाडे,माजी पं. स.उपसभापती होमराज पुस्तोडे,सरपंच मीना शहारे,लोकपाल गहाणे उपस्थित होते.  येथील फकीरा भसाखेत्री आणि मित्रपरिवाराच्यावतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रमेश गहाणे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराम खोब्रागडे,कैलास भसाखेत्री,हेमराज डहाके,प्रल्हाद बनसोड, विनोद भसाखेत्री,अर्चना भसाखेत्री,विश्वनाथ खोब्रागडे,पृथ्वी डहाके यांनी केले