गृह राज्यमंंत्री भोयर यांच्या हस्ते ” फिरते सायबर दूत ” वाहनाचे लोकार्पण

0
140

गोंदिया,दि.१९ः जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता, जनतेच्या कल्याणाकरीता कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, यांच्या संकल्पनेतुन आणि अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प देवरी) नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत ” फिरते सायबर दूत ” वाहनाचा लोकार्पण सोहळा गृह राज्यमंत्री डाॅ.पंकज भोयर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय (कारंजा) गोंदिया येथे पार पडला.

दिवसेंदिवस सायबर अपराधापासून बऱ्याच लोकांची फसवणूक होत आहे व दिवसागणिक सायबर अपराध ही समस्या उग्र रूप धारण करत आहे. यावर पायबंद व्हावा, यापुढे लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून व गोंदिया जिल्ह्यातील नागरिक हे सायबर साक्षर व्हावेत या उद्देशाने “फिरते सायबर दूत ” वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
“फिरते सायबर दूत वाहन” हे गोंदिया जिल्ह्यातील वर्दळीच्या ठिकाणी जसे – बाजार, चौक तसेच बस स्थानक या ठिकाणी जाऊन व्हिडीओ द्वारे तसेच पोस्टर व बॅनर द्वारे लोकांना सायबर साक्षर करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे गृह राज्यमंत्री ना.डॉ.पंकज भोयर यांनी कौतुक केले.

सदरचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याकरिता सायबर सेल गोंदिया, येथील अधिकारी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सपोनि ओमप्रकाश गेडाम,पोलीस अंमलदार संजय मारवाडे, प्रमोद सोनवाने, रोशन येरणे, योगेश रहीले, अश्विन वंजारी, राधेश्याम कांबळे, रमेश हलामी , महीला पोलीस अंमलदार वंदना बिसेन, राजश्री घोंगे, शितल कोचे, किरण गायकवाड यांनी परिश्रम घेत आहेत.