गोंदिया,दि.२०ः राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाच्यावतीने आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील राणी अवंतीबाई चौकात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुलाव वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष सौरभ रोकड़े, ओबीसी जिल्हाध्यक्ष रूपेश मेंढे,गोंदिया विधानसभा अध्यक्ष शेखर चामट,शहर अध्यक्ष अक्की अग्रहरी, युवा अध्यक्ष बादल मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता रविन्द्र पंचे,शिव लिल्लारे, पिंटू भलावी,आकाश जायसवाल ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.