गोंदिया,दि.२१ः-“कायाकल्प” ही सार्वजनिक आरोग्य सुविधांचे मूल्यांकन करण्याची सुधारीत नविन निरतंन प्रक्रिया आहे. हे मूल्यांकन एका चेकलिस्टवर आधारित आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत “कायाकल्प” योजनेतुन जिल्ह्यातील आरोग्य संस्थेची आरोग्य सुविधा व गुणवत्ता सुधारणा करीत असल्याची माहीती डॉ.नितीन वानखेडे यानी दिली आहे. जिल्ह्यात 1 उपजिल्हा रुग्णालय,10 ग्रामीण रुग्णालय,45 प्राथमिक आरोग्य केंद्र,263 उपकेंद्र असुन काही आरोग्य संस्थानी कायाकल्प पुरस्कार प्राप्त केला आहे व काही आरोग्य संस्था त्यात भाग आहे. दरवर्षी आरोग्य संस्थेचे जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील अधिकारी विविध टप्प्यात चेकलिस्ट व्दारे मूल्यांकन करुन रिपोर्ट सादर करित असल्याची माहीती जिल्हा गुणवत्ता आश्वासन सनियंत्रण अधिकारी डॉ.पंकज पटले यांनी दिली आहे.
आरोग्य संस्थेतील गुणवत्ता वाढविणे हे एक टिम वर्क असुन एकमेकांच्या सहकार्याने गुणवत्ता साध्य होत असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.त्यासाठी वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी, फार्मासिस्ट,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,स्वच्छक,परिचर, आशा सेविका हे विविध रेकॉर्ड व रजिष्टर्स अद्यावत करुन रुग्णालय सुविधा व स्वच्छता ठेवुन लोकांना आरोग्य सेवा देत असतात.
दि.20 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांचे सह जिल्हा स्तरीय चमुने तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाक व सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथे भेट देवुन “कायाकल्प” योजने अंतर्गत आरोग्य संस्थेचे मुल्याकंन केले तर दुसरी चमु त्यात जिल्हा गुणवत्ता आश्वासन सनियंत्रण अधिकारी डॉ.पंकज पटले यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदीर कुंभीटोला व ताडगाव येथे भेट देवुन मुल्याकंन केले.
मूल्यांकनाचे निकष काय आहेत?
- रुग्णालय/सुविधा देखभाल
- स्वच्छता
- कचरा व्यवस्थापन
- संसर्ग नियंत्रण
- समर्थन सेवा
- स्वच्छता प्रोत्साहन
मूल्यांकनाचा निकाल काय आहे?
- मूल्यांकनात ७०% आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या आरोग्य संस्था सुविधा कायाकल्प पुरस्कार किंवा प्रमाणपत्रासाठी निवडल्या जातात.
कायाकल्प योजनेचे मार्गदर्शक तत्वे काय आहेत?
- रुग्णालयांची देखभाल आणि सुविधा सुधारणे.पायाभूत सुविधांची देखभाल करणे.
- रुग्णालयीन स्वच्छता आणि स्वच्छता व्यवस्थापन सुधारणे.
- सुका आणि ओला कचरा व्यवस्थापन.
- संसर्ग नियंत्रण व्यवस्थापन.
- आरोग्य सेवा सहाय्य.
- स्वच्छतेचा प्रचार करणे.