शिवाजी महाराजांचे गुण अंगिकारणे आजच्या पिढीची गरज – मुक्ता नरेंद्र दाभोळकर

0
190

एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजमध्ये शिवाजी महाराज जयंती साजरी
गोंदिया,दि.२१ः-स्थानिक एम.जी.पॅरामेडिकल काॅलेजमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आजच्या युवा पिढीला शिवरायांचे विचार अंगिकार करुन समाजातील कुप्रथावंर आळा घालण्याकरीता पुढे येण्याची गरज असल्याचे विचार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकारीणी सदस्या मुक्ता दाभोळकर यांनी केले.

पुढे बोलतांना मुक्ता दाभोळकर म्हणाल्या की,शिवाजी महाराजांचे विचार वैज्ञानिक दृष्टिकोणाचे होते.ते अंधश्रध्देला आळा घालत होते,त्यामुळे त्यांनी जास्त मोहिमा ह्या अमावस्यालाच केल्या.सतत् रयतेचे हितासाठी कार्य करत होते.तसेच अनिसचे राज्य कार्य.सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी शिवाजी महाराजांचे सैन्य हे निवड सैनिकच नव्हते तर ते कुशल शेतकरीही होते,त्यामुळेच शेतीकरीता सैन्यातील सैनिकांना रजा देणारे ते एकमेव राजे होते.या प्रसंगी अंनिसचे जिल्हा मार्गदर्शक माणिक गेडाम, अध्यक्ष केवलराम उके, संविधान मैत्रीसंघाचे अतुल सतदेवे,प्रा.दिशा गेडाम, ज्येष्ट नागरिक संघाचे वसंत गवळी,ओबीसी सेवा संघाचे सी.पी.बिसेन,ओबीसी अधिकार मंचचे कैलास भेलावे,बहुजन युवा मंचचे सुनिल भोगांडे,ईश्वर चिवनकर, सेवानिवृत्त शिक्षिका उमा गजभिये, तक्षशिला गडपायले उपस्थित होते. याप्रसंगी लेझिम, समुह नृत्य व विविध कार्यक्रम घेण्यात आले.सूत्रसंचालन विध्यार्थी प्रतीनिधी कु.शिवानी बघेले हिने केले,तर कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती गोंदियाचे कार्याध्यक्ष व एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजचे संचालक अनिल गोंडाने यांनी मानले.आयोजनाकरीता प्राचार्या अनुसया लिल्हारे,प्रा. प्रिती वैद्य,प्रा.छाया राणा,प्रा.रामेश्वरी पटले,प्रा.आरती चौधरी,प्रा.मनिष चौधरी,प्रा.गायत्री बावनकर,राजू रहांगडाले,सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे,श्लेषा लाडे,योगेश्वरी ठवरे व रूपाली धमगाये यांनी सहकार्य केले.