
देवरी,दि.२७ः- येथील नगरपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या त्रिमुर्ती नगरच्या भुमापन क्र. 309/01/ब या जागेवर नागरीकांसाठी सोडलेल्या मोकळ्या व खुल्या जागेवर सार्वजनिक गणेश साई बहुद्देशीय संस्था देवरीने केलेल्या नियमबाह्य बांधकामाला त्वरीत थांबविण्याची मागणी त्रिमुर्ती नगरच्या नागरिकांनी पोलीस स्टेशन व नगरपंचायतीला पत्र देऊन केली आहे.त्रिमुर्ती नगरच्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला रितरसर तक्रार अर्ज देत कारवाईची मागणी केली होती.सोबतच नगरपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करुन सदर नियमबाह्य बांधकामाबद्दल माहिती घेतली असता नगरपंचायतीनेही सदर बांधकाम नियमबाह्य असल्याची माहिती दिली.
विशेष म्हणजे ले-आऊट मधील मुळ प्लाट धारकांसांठी मनोरंजन, विरंगुळा, सामुहीक उपयोग, इत्यादीकरीता राखीव ठेवण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर सार्वजनिक गणेश-साई बहुउद्देशीय संस्था, देवरी यांनी नगर पंचायत देवरी कार्यालयाकडुन रितसर बांधकाम परवानगी न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे अवैध बांधकाम केलेले आहे. त्याकरीता सदर संस्थेला अनाधीकृत बांधकाम थांबविण्याबाबत नगरपंचायतीच्यावतीने ताकीद देण्यात आली आहे. ले आऊटमधील अनधिकृत बांधकामाबद्दल भोजराज शामराव फुंडे,श्रीमती पदमा भोजराज फुंडे,जितेंद्र प्रभुलाल बारसागडे,अनंत चिंतामन शहारे,श्रीमती माधुरी अनंत शहारे,जितेंद्र केशवराव फाये,विजय म्यानीराम मंदाळे,गीतमाला सुनिल वाघमारे, माधुरी जितेद्र बारसागडे,विशाखा जितेद्र फाये,कुंदा सुधीर भांडारकर,लता किशोर उईके,किशोर म.उईके,राहुल भाष्कर,सुरेश तानबाजी बावनथडे,अहिल्याबाई सुरेश बावनथडे, राजललन रामनरेश तिवारी,संगीता आर.तिवारी,सुधीर भांडारकर,उर्मिला उईके, मदन राजाराम उईके, विनोद आर. देशभूख,लक्ष्मी विनोद देशमुख ,निशा गोंधळे,सुधा ताराम आदींनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे.