अर्जुनी-मोर.-श्रीसंत अमररत्न तवाडे महाराज हे आधुनिक युगातील थोर समाजसुधारक अध्यात्मिक व धार्मीक संत आहेत.त्यांचे विचार प्रत्येक समाजासाठी प्रेरणादायी आहेत.विदर्भ ,महाराष्ट्रासह अन्य भागातही त्यांचा मोठा शिष्यवर्ग तयार झाला आहे.संताचे विचार नेहमीच समाजसुधारणेच्या दृष्टीने असतात.या संत सम्मेलन कार्यक्रमाने धार्मिक उत्सवाची गोडी वाढते,संत अमररत्न तवाडे महाराजांचे विचार दिपस्तंभासारखे आहेत.त्यांचे विचार प्रत्येकांनी अंगीकारण्याचे आवाहण गोंदिया जिल्हा परिषद चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
श्री संत अमररत्न तवाडे बाबा दिपस्तंभ सेवाभावी संस्था ढासगड येथे आयोजित अखंड ज्योत जागृती व भव्य गोपालकाला निमित्त आयोजीत कार्यक्रमात भेंडारकर बोलत होते.यावेळी आमदार राजकुमार बडोले,माजी सभापती व जि.प.सदस्य सविताताई पुराम,सडक/अर्जुनी पंचायत समीती सभापती चेतन वळगाये, देवरी पंचायत समीती सदस्य अनिल बिसेन व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आमदार राजकुमार बडोले,संजय पुराम यांनीही भाविकभक्तांना मार्गदर्शन करुन संत आणी महापुरुषांच्या आदर्श विचारानेच प्रत्येक मानवांची प्रगती होत असुन त्यांनी सांगीतलेल्या मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे.कार्यक्रमाला संत अमररत्न तवाडे महाराजांचे शिष्य व ग्रामवासी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.