अर्जुनी-मोर. पाणी हे जिवन आहे.प्रत्येक नागरीकांस शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क व अधिकार आहे.प्रत्येक गावात घरगुती वापरांसाठी व पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळावे हे आपले धोरण आहे.आता पुर्वीसारखी तिव्र पाणी टंचाई भासत नाही.सरकारचे वतीने गावागावात विवीध योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोत निर्माण झाले आहेत. तरीही केंद्र सरकारनी हर घर नल हर घर जल ही महत्वाकांक्षी जलजिवन मिशन योजना काढली आहे.ही योजना थोडी संथगतीने तयार होत असली तरी भविष्यात या योजनेमुळे प्रत्येक गाव जलमय होणार असे प्रतिपादन अर्जुनी-मोर. विधानसभेचे आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी तालुक्यातील परसोडी / रयत येथे केले.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील परसोडी/ रयत येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजीत( ता.27 ) कार्यक्रमात आमदार बडोले बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंदिया जि. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते.अतिथी म्हणून माजी जि.प.उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य यशवंत गणवीर, माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे,सरपंच दयाराम लंजे,ग्रा.पं.सदस्य सि.बी.टेंभुर्णे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थीत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनीही गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही जलस्त्रोत वाढविण्याच्या योजना आहेत.त्याकडे विशेष लक्ष देवुन जिल्ह्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाई जाणवणार नाही.याकडे आपण प्राधान्यक्रमाने लक्ष घालु असे प्रतिपादन केले.