गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील भुताईटोला सांसद आदर्श ग्राम पाथरी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते केवलराम बघेले यांचा अध्यक्षतेखाली करण्यात आले.
भूताईटोला सासंद आदर्श ग्राम पाथरी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोदार, खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडप बांधकामाचे उदघाट्न, इंजि. कृष्णकमल केवलराम बघेले यांच्या स्व निधीतून हनुमान मंदिराचे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले. शारदा माता मंदिर बांधकाम केवलराम जियालाल बघेले यांच्याकडून दान केलेल्या निधीतून तयार करण्यात आले. श्री प्रभू रामजी व चक्रवर्ती राजाभोज आणि भगवान बिरसा मुंडा आणि माॅ गढकालिकाचे सामूहिक दरबार भूताईटोला गावाकडून तयार करण्यात आले. सदर कामांचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव स्वराज सप्ताह आणि संत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वछता सप्ताह तसेच सम्राट राजाभोज जयंती ग्रामवासीयांकडून साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने आरोग्य शिबीर आणि मोफत औषध वितरण करण्यात आले. महिलांचे हळदी कुंकू व वाण वितरण, दहिकाला करून महाप्रसाद वितरण करण्यातआले. देवि जागरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळेस संपूर्ण कार्यक्रम केवलभाऊ बघेले याच्या अध्यक्षतेखाली, आमदार राजकुमार बडोले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. पूष्पराज गिरी, पन्नालाल बोपचे, सोमेश रहांगडाले, खूशाल वैद्य, भूपेश गौतम, कृष्णकुमार बिसेन, इंजि. मनिश धमगाये, डिलेश्वरताई तिरेले, हिरनताई तिरेले, घनेश्वर तिरेले, डाॅ. गणेश बघेले, सूनिल कापसे, अनिल मळावी, रविकांत लाजेवार, दादी भाऊ शहारे, सोनवाणे महाराज, नन्दूप्रसाद महाराज, प्रेमलाल घरत महाराज, देवचंद राऊत, भूमेश्वर राऊत, डाॅ. शदिप पटले, डाॅ. बिसेन, डाॅ. पेमेन्द्र ठाकूर, मनिषा मेश्राम व आशा सेविका आणि भूताईटोला, पाथरी, सिलेगाव, मेगाटोला परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.