अर्जुनी-मोर.-जिल्हा परिषद सदस्य म्हणुन अडीच वर्षाच्या कालावधीत ईटखेडा क्षेत्रातील गावांत शक्य तेवढे विकासाची कामे करण्यात आली.आणी आज इटखेडा क्षेत्रातील नागरीक व मतदारांचे आशिर्वादाने आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या कृपेने गोंदिया जि.प.मधे महिला व बालकल्याण सभापती बनण्याचा योग आला.या पदाला न्याय देवुन जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाचा स्तर उंचावण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. या सभापती पदामुळे आपल्याला जिल्ह्यातील नागरीकांची व विशेष करुन महिला व बालकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.या संधीचे आपन सोने करु असे प्रतिपादन ईटखेडा क्षेत्राच्या जि.प.सदस्य तथा गोंदिया जि.प.च्या नवनिर्वाचित महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमा उमाकांत ढेंगे यांनी केले आहे.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील ईटखेडा जि.प.क्षेत्रातील तिडका / करड येथे( ता.2 )नव्याने बांधण्यात येणा-या अंगणवाडी ईमारतीच्या भुमिपुजन प्रसंगी भुमिपुजक म्हणुन पोर्णिमा ढेंगे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने होते.यावेळी सरपंच वनिताताई उईके, उपसरपंच आसाराम मेश्राम, पो.पा.प्रशांत पुस्तोळे, ईंजी.नितीन नाकाडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ईतर पदाधिकारी,अंगणवाडी सेविका व मदतनिश प्रामुख्याने उपस्थीत होते.यावेळी पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने यांनीही आपले विचार व्यक्त करतांना ईटखेडा जि.प.क्षेत्राचा सर्वांगीण विकास सभापती पोर्णिमा ढेंगे यांचेसोबत मिळुनमिसळुन करुन जनतेची कामे संयुक्तपणे करण्याचे आश्वासन दिले.