गोंदिया : कारंजा येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल मध्ये मंगळवार, 4 मार्च रोजी गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस उप-निरीक्षक गौरीशंकर बुधलाल कटरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक झामसींग किरसान, सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश हरी हटवार, सहायक पोलीस उप-निरीक्षक मनोहर प्यारेलाल अंबुले तर पोलीस हवालदार उमेशचंद्र रामचंद्र कोल्हारे यांचा गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे शुभ हस्ते शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, सुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील भावी आयुष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छ्या देण्यात आल्या. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक गोरख भामरे, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) रामेश्वर पिपरेवार, पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांनी केले. यशस्वीतेकरिता कल्याण शाखा येथील रामेश्वर पिपरेवार, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य यांनी सहकार्य केले.