गोंदिया – शहरालगत असलेल्या फुलचुर येथे तीन दिवसीय पटाला दिनांक ३ मार्चपासून सुरुवात झाली असून उद्या ५ मार्च रोजी शंकरपटाचा अंतिम दिवस आहे.शंकरपटाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या हस्ते गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, राजेश चतुर, राजकुमार (पप्पू) पटले, नीलम हल्मारे, सरपंच मिलन रामटेककर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. शंकरपटात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शंकर पट समितीचे उपाध्यक्ष देवचंद बिसेन व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.