40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ पवार बोर्डिंग येथे जागतिक महिला दिन ९ मार्च रोजी

पवार बोर्डिंग येथे जागतिक महिला दिन ९ मार्च रोजी

0
137

blank

गोंदिया : पवार प्रगतीशील मंच गोंदियाच्या सानिध्यात पवार महिला समितीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी स्थानिक पवार सांस्कृितक भवन कन्हारटोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन बालाघाटचे खासदार सौ. भारती पारधी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य विमल कटरे उपस्थित राहणार आहेत. तसेच जि.प.सदस्य अश्विनी पटले यासह प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती सालेकसा विना कटरे, पं.स.सभापती योगिताबाई फुंडे, पं.स.सभापती चित्रलेखाबाई चौधरी, पं.स.उपसभापती सुनंदाबाई पटले, पं.स.सदस्य वंदना पटले, विद्याकला पटले उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून तिरोडाचे आगार व्यवस्थापक संजना पटले, बालविकास प्रकल्प अधिकारी शितल कटरे, पो.हवा. प्रिया शंरणागत तर विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रिती देशमुख, सौ. रश्मी रहांगडाले उपस्थित राहणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार तसेच विविध कार्यक्रम आयोजित असून स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला समितीचे अध्यक्ष आरती कटरे, सचिव दुर्गा ठाकरे, उपाध्यक्ष रंजू रहांगडाले, शैफाली बिसेन, दीप्ति पटले, आरती चौधरी, कोषाध्यक्ष अ‍ॅड. राजकुमारी कटरे, सहसचिव मोहिनी बोपचे, संघटन सचिव शिल्पा पटले, प्रचार सचिव सुनिता कटरे, इंद्रायनी रहांगडाले, पुजा टेंभरे, लक्ष्मी ठाकुर, कुंतन पटले, कविता चौधरी, ममता येडे, शोभिका बिसेन, सिमा हिरणखेडे, जानकी पारधी, शितल पटले, प्रिती बघेले, प्रतिभा रहांगडाले, रेखा बिसेन, त्रिवेणी बघेले, अश्विनी कटरे, राधा चौधरी, मिना टेंभरे, सुनिता ठाकुर, कंचन हरिणखेडे यांनी केले आहे.