गोंदिया :- गोंदिया येथील सायकलींग संडे गृपच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने विशेष सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रैलीमध्ये गोंदिया शहरातील शेकडोच्या संख्येने गृहिणींसह शासकीय, निम शासकीय महिला कर्मचारी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या सायकल रैलीत जिल्हाधिकारी प्राजित नायर हे देखील सहभागी होणार आहेत. नागरिकांचे आरोग्य सुद़ृढ रहावे, नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी त्याच पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी गोंदियातील काही युवक व युवतींनी मिळून २०१७ या वर्षी सायकलींग संडे गृपची स्थापना केली असून आठवड्यातून एक दिवस दर रविवारी या गृपच्या माध्यमातून किमान १० किमी सायकल चालविण्यात येते. दरम्यान, महिलांसाठी काहीतरी वेगळा करता यावा यासाठी गृपच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार ८ मार्च रोजी शहरात सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ६ वाजता शहरातील जयस्तंभ चौक येथून या रैलीला सुरुवात होणार असून आंबेडकर चौक, हनुमान मंदिर चौक, इंगळे चौक, मामा चौक, साई मंदिर, संत गजानन मदिर, शास्त्री वार्ड, निर्मल टॉकीज होत पुन्हा जयस्तंभ चौक व यानंतर गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक आदी परिसर भ्रमण करून इंदिरा गांधी स्टेडीयम येथे या रैलीचे समापन करण्यात येणार आहे. विशेषतः या रैलीत शाळकरी मुलींसह महाविद्यालयील विद्यार्थीनी, गृहिणींपासून महिला डॉक्टर, पोलिस, वकील शिक्षिका आदी महिला कर्मचारी, अधिकारी आदी शेकडो महिला सहभागी होणार आहेत.
या रैलीचे आयोजन महिला दिनानिमीत्त करण्यात येत असून महिलांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य सुद़ृढ रहावे, त्याच बरोबर पर्यावरणाच्या समतोलनात त्यांचाही हातभार लागावा या उद्देशाने सायकलींग संडे गृपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.दिपाली वाढई, सदस्य, सायकलींग संडे गृप गोंदिया
…
सायकली चालवणं हे महिलांसाठी आत्मनिर्भर आणि आरोग्यासाठी उत्तम आहे, त्याच प्रमाणे नियमित सायकल चालविल्याने मन प्रसन्न असते महिलांसाठी सायकल चालवणे हे उत्तम व्याम आहे. तर प्रत्येक महिलांनी सायकल चालवावे…
प्रियंका रत्नाकर, सदस्य, सायकलींग संडे गृप गोंदिया