महिला दिनानिमित्ताने कुपोषित बालके,गरोदर व स्तनदा माताना ग्रामपंचायततर्फ प्रोटीन पाऊडर वाटप

0
14

गोदिया,दि.०८ःः तालुुक्यातील ग्राम पंचायत रायपुर येथे जागतिक महिला दिन साजरा केला गेला.याप्रसंगी गावातील महिला यांची विशेष सभा घेवून त्यांचे जीवनमान अधिक सुलभ सहज व आरोग्यवर्धक रहावे गावात कुपोषण मुक्तिच्या दिशेने वाटचाल होणे कामी अधिकाधिक जाणीव जागृती व सार्थक उपाययोजना करणे करिता विशेष प्रयत्न करण्याचे संकल्प करून व विशेषतः गरोदर माता यांची सर्व प्रकारे काळजी घेवून संतुलित आहार सह आवश्यक आराम करणे करिता परिवारातील प्रतेक सदस्य यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांचे नियोजित लसीकरण व आरोग्य तपासणी साठी परिवाराने खबरदारी घ्यावी असे मार्गदर्शन पर आव्हान ग्राम पंचायत अधिकारी कमलेश बिसेन यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रम वेळी गावातील गरोदर माता ,स्तनदा माता व कुपोषित बालके यांना हाय प्रोटीन पाउडर चे वितरण करण्यात आले. गावात एकूण बारा गरोदर माता अठरा स्तनदा माता कुपोषित बालके तेरा असे त्रेचाळीश लाभार्थी यांना प्रोटीन पाऊडर सौ छायाबाई नेवारे सरपंच व कमलेश बिसेन ग्रामपंचायत अधिकारी यांचे हस्ते वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रम करिता ललिता लोकचंद बिजेवार ,गायत्री घनश्याम रहंगडाले अंगणवाडी सेविका,आशा सेविका विद्या चिंतामण बिजेवार ,अशोक पाचे ग्राम पंचायत कर्मचारी , ज्योतिष रहंगडाले संगणक परिचालक यांनी मदत केली .कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ छायाबाई नेवारे सरपंच वितरक कमलेश बिसेन ग्रामपंचायत अधिकारी,प्रमुख उपस्थिती ओमकार मात्रे उपसरपंच , शैलेश गजभिये सदस्य , उमेश ठाकरे सदस्य, लता हटेले सद्स्य, सरस्वती टेकाम सदस्य, उषा फाये सदस्य, कल्पना कोहरे सदस्य, अल्का ठाकरे सदस्य, ओमशंकर रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता, राजू रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता, केवलचंद रहांगडाले माजी सरपंच, जीतलालजी रहांगडाले माजी सरपंच, मनोज कोल्हे माजी सरपंच, केवल राम रहांगडाले माजी सरपंच,डॉ सोहनलाल रहांगडाले माजी पंचायत समिती सभापती, नरेंद्र बोरकर सामाजिक कार्यकर्ता,धर्मेंद्र देशभ्रतार सामाजिक कार्यकर्ता, मनोज मेश्राम, संजय घरटे, हरिचंद बिसेन, चुन्नीलाल रहांगडाले, शालिग्राम पाचे, गुनि राम कोहरे, रूपदास दणदरे सामाजिक कार्यकर्ते , दिनेश येशने तमुस अध्यक्ष, लोकचांद बीजेवार पोलीस पाटील यांच्या उपस्थित्त मध्ये संपन्न झाले.