गोंदिया,दि.२२ मार्चः जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत शासनाच्या शंभर दिवस योजनेच्या अनुशगांने पथनाट्यातून रक्तदान महादान व कामाच्या ठिकाणी स्त्रीयांवरील लैंगिक अत्याच्यारावर विषयावर जनजागरण करण्यात आले.यानिमित्त देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी लक्ष वेधले.
सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनामार्फत शंभर दिवसीय कार्यक्रमाच्या अनुशंगाने मोठ्या प्रमाणात नाविण्यपुर्ण उपक्रमातुन जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, शासकिय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्ह्यात विविध विभाग व आरोग्य विभागात शंभर दिवसीय कार्यक्रमाच्या अनुशंगाने मोठ्या प्रमाणात नाविण्यपुर्ण उपक्रम हाती घेण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा परिषदे कार्यालयातील विविध विभागातील महिला व पुरुष अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी चित्रा ठेंगरे व आरोग्य विभागाचे आयईसी अधिकारी प्रशांत खरात यांनी मनोगत आपले व्यक्त केले.
शासकिय कार्यालयात स्त्रीयांवर होणार्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध स्त्रीयांना जाणीव होणे व त्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी तिला पाठबळ मिळण्याच्या दृष्टिकोनातुन हा पथनात्य कार्यक्रम हाती घेतल्याची माहीती प्रसूती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. राजश्री पाटिल यांनी यावेळी दिली.तर जिल्ह्यात अपघात,सिझेरियन व ईतर शस्त्रिक्रिया पाठोपाठ सिकलसेल, थँलेसिमिया आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते त्यामुळे गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तदान रक्त संकलन करण्याबाबत जनजागृती चळवळ निर्माण येत असल्याची माहीती पँथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.अर्चना रांधले यांनी याप्रसंगी म्हटले.पथनाट्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अनंत चांदेकर व डॉ.श्री यांनी पुढाकार घेतला होता.
जिल्हा परिषद कार्यालयातील पथनाट्य सादरीकरण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशिक्षनार्थी जांन्वी पंजाबी,अर्पिता चावरे,साक्षी खरोने,अंसारी शबाना शाहिन,रिशा चव्हाण,पुर्वा पैपारे,श्रृती घोगरे,आरती गुरुस्थले,आभा टोंगे,राधा गुजरकर,अंजली बडे,जय जावरकर,विवेक पाटील यश अहेर,प्रज्योत देरकर,विधान राठोड,निखिल वालेशा,मिथिलेश भगत,प्रितेश बंसोड,पवन ईंडे,अंशुल हटवार,प्रद्युमन शुक्ला,अरोन सॅम्युएल,उत्कर्ष रामटेके,अनिल सिंघ यांनी सहभाग घेतला तर पथनाट्याचे लिखाण व संकल्पना मुस्कान पिरसाब,आदिती यादव,जान्वी पंजाबी,सबिहा ईक्बाल,जय जावरकर,यश अहेर यांनी केली होती.