_ नागपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. विराज शिंगाडे, करणार मोफत शस्त्रक्रिया.
_ समग्र शिक्षाचा बहुआयामी उपक्रम.
गोंदिया,दि.२४ः समग्र शिक्षा च्या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या समावेशीत शिक्षण विभागामार्फत उद्या दिनांक २५ मार्च 2025 रोजी जिल्ह्यातील अंगणवाडी तथा इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अस्थिव्यंग मुलांसाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर बाई गंगाबाई रुग्णालयात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांत नागपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. विराज शिंगाडे मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत.
समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुरुगानंथम एम. यांच्या मार्गदर्शनात 0 ते 18 वयोगट असलेल्या दिव्यांग मुलांच्या साठी मोफत शस्त्रक्रिया करण्याचा कार्यक्रम विभागाने हाती घेतलेला असून पहिल्या टप्प्यात उद्या जिल्ह्यातील 99 अस्थिव्यंग मुलांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करण्यात येणार असून या करीता नागपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ श्री विराज शिंगाडे यांना प्राचारन करण्यात आले असून त्यांच्या हॉस्पिटल मध्ये सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
सदर शिबिर बाई गंगाबाई रुग्णालयात स्थित जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात ठेवण्यात आले असून शिबिरांत आमगाव 16, अर्जुनी मोर 13, देवरी 16 , गोंदिया 17, गोरेगांव 13 सडक अर्जुनी 10, सालेकसा 7 व तिरोडा 7 असे एकुण 99 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. शिबिराला विद्यार्थ्यांना उपस्थित करण्याची जबाबदारी समावेशित शिक्षण विभागाचे तालुका समन्वयक व विशेष शिक्षकांना देण्यात आली आहे. शिबिराच्या यशस्वितेकरीता जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची यंत्रणा कामाला लागली आहे.