तेंदुपत्ता तोडणी करतांना जिवाची काळजी घ्या :- आमदार राजकुमार बडोले

0
52

अर्जुनी-मोर.-सध्या आपल्या जिल्ह्यात तेंदुपत्ता तोडणीचा हंगाम सुरु होत आहे.आपल्या जिल्ह्यात व विशेष करुन अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रात घनदाट जंगल असुन जंगली जनावर व हिंस्र पशुंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.मानव- पशुं संघर्ष वाढतांनी दिसत आहेत.आपल्या जिल्ह्यात जंगली जनावरांनी अनेकांचा बळी सुध्दा घेतलेला आहे.तेव्हा शेतकरी बंधु,मोलमजुरी करणारे मजूरवर्ग तथा महिला भगिणींनी जंगलात तेंदुपत्ता तोडणी करतांना स्वताच्या जिवाची काळजी करण्याचे आवाहन अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. मोहफुल गोळा करण्याचेही काम याच मोसमात सध्या सुरु आहे. सोबतच तेंदुपत्ता तोडणीचा हंगामही सुरु होत आहे .जंगलामधे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात वाढले असुन पिण्याचे पाण्यासाठी वन्यप्राणी एकदम गावांगवळ येत असतात.सोबतच जंगलपरिसराला लागुनच मोठ्या प्रमाणात शेतशिवार सुध्दा आहेत.अशा मोसमात शेतकरी, शेतमजूर,महिला भगीणींनी स्वताचे जिवाची काळजी घ्यावी.नुकताच 23 मार्च 2025 रोजी अर्जुनी-मोर. तालुक्यात गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत आदिवासी दुर्गम भाग असलेल्या शिवरामटोला येथे सकाळच्या सुमारास मोहफुल गोळा करण्यासाठी कक्ष क्र,332 मधे गेलेल्या अनुसया धानु कोल्हे या 50 वर्षीय महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली आहे.वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी सर्व जनतेनी सजग असणे गरजेचे आहे.तथा वनविभाग वारंवार देत असलेल्या सुचनेनुसारच जंगलासंबधी कामे करावी असे आवाहन ही आमदार बडोले यांनी केले.त्यासाठी आमदार बडोले यांनी काही सूचनाही केलेल्या आहेत.त्यानुसार कुणीही एकट्याने जंगल परिसरात जावु नये,तिन किंवा चार किंवा त्यापेक्षा जास्त गटाने आवाज करीत जंगलात प्रवेश करावा,जंगलात सजग राहुन चौफेर नजर ठेवावी,शरीरयष्टीने कमकुवत व्यक्तीने जंगलात जाण्याचे टाळावे,जंगलातील पाणवठ्याजवळील परीसरात तेंदुपत्ता तोडणी टाळावी,जंगलात आग लागेल असे कृत्य करु नये,वनविभागाचे नियमांचे तंतोतंत पालन करावे अशा सूचनाही आमदार राजकुमार बडोले यांनी प्रसिध्दीपत्रकातुन केले आहे.