
गोंदिया- जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या लघु सिंचन विभागात सध्याच्या घडीला माजी मालगुजारी तलावांच्या खोलीकरणासह दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला आहे.शासनाकडून त्या अंदाजे ४०० ते ५०० कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असली तरी त्या कामांना जी महत्चाची मंजूरी असते ती तांत्रिक मंजुरी मात्र अद्यापही दिली गेली नसल्याचे वृत्त आहे.तांत्रिक मंजुरी न देताच कामांची निविदा काढून वर्क आर्डर देत त्या कांमाना सुरवात करण्यात आली आहे.३१ मार्च २०२५ पर्यंत ती कामे कशापध्दतीने पुर्ण करता येतील याकरीता कंत्राटदारांना कामाची गती वाढविल्याचे दिसून येत असले तरी ३१ मार्चपुर्वी ही कामे पुर्ण होणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सदर कामांना मुदत वाढ देण्याकरीता लघुसिंचन विभाग पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.