तिरोडा,दि.०२ः तालुक्यातील निमगाव व इंदोरा गावाजवळून वाहणाऱ्या स्थानिक नाल्यावरील प्रस्तावित निमगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाची कार्यवाही तातडीने करुन काम सुरु करण्याची सुचना आमदार विजय रहागंडाले यांनी नागपूर येथे वनसरंक्षक यांच्या कार्यालयात गोंदिया व भंडारा वनविभागाचे व पाटबंधारे विभाग अधिकार्यासोबंत आयोजित बैठकित केली.
सदर प्रकल्पामुळे 3.915 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्मित होणार असून सिंचन क्षमता 1062 हे. निर्मिती होणार आहे. सदर प्रकल्प पुर्ण झाल्यास बोदलकसा मध्यम प्रकल्पातून निघणाऱ्या उजवा कालव्या द्वारे मौजा निमगांव. इंदोराखुर्द, भिवापूर, मेंदीपुर, बेरडीपार, बरबसपुरा, काचेवानी, खैरबोडी, चिरेखनी, गराडा, पालडोंगरी भुराटोला व चुरडी या 13 गावांना पाणी मिळणार आहे.या प्रकल्पास दि. 09.07.1973 अन्वये रु. 23.70 लक्ष रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. प्रथम प्रशासकीय मान्यता दि. 03.12.1980 अन्वये 51.317 लक्ष प्राप्त झालेली असुन द्वितीय प्रशासकीय मान्यता प्राप्त दि. 12.05.2008 अन्वये रु. 1876.41 लक्ष रुपयास प्राप्त झालेली आहे. प्रकल्पाचे घळभरणी वगळता दोन्ही तिरावरील मातीकाम रोहयो अंतर्गत 80 टक्के, सांडवा पूर्ण व आगमन निर्गमन नालीचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. वनजमिनीच्या अडचणीमुळे उर्वरीत काम सुरु करता आले नाही.या प्रकल्पाकरीता 141.62 हेक्टर (सुधारीत 135.15 हेक्टर ) वनजमीनीच्या प्रस्तावास केंद्र शासनाचे पत्र दि.23/08/2006 अन्वये तत्वत% मान्यता प्राप्त झालेली आहे.वन विभागाच्या मागणी नुसार पर्यायी वनीकरणाकरिता विभागाने दि 02/12/2008 ला रु. 13,18,04,757 निधीचा भरणा केला असून सदर प्रकल्पाचे क्षेत्र दि 12/12/2013 रोजी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ (NBWL) च्या दि 05/12/2018 च्या 14 व्या बैठकीत राष्ट्रीय वन्यजीव मंडळ (NBWL) ची मान्यता सुध्दा घेण्यात आली आहे.त्यानंतर CAT plan ला प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांनी दि 23/06/2023 ला मंजुरी प्रदान करून मागणी सादर केल्यानुसार या विभागाकडून दि 29/08/2023 ला रु. 1,32,43,100/- चा भरणा करण्यात आले.मालमत्ता मूल्याची फरकाची रक्कम नवीन दराने व पर्यायी वनीकरणाकरीता दि 27/03/2023 आणि 31/03/2023 ला अनुक्रमे रु 5,13,26,000/- व 9,48,50,918/- ची आवश्यक रक्कम वनविभागाकडे भरण्यात आले आहे. तसेच वन प्रस्ताव केंद्र शासनास अंतिम मान्यते करिता दि 24/11/2023 ला सादर करण्यात आले होते. परंतू सदर प्रस्तावावर मुद~दे उपस्थित करून केंद्र शासनाने दि.17/05/2024 च्या पत्रान्वये मुद~दयांचे अनुपालन करण्याबाबत कळविले आहे. त्याअन्वये या विभागाशी संबंधीत उपस्थित मुद~दयांचे अनुपालन करून या विभागाचे पत्र क्र. 1652/प्रशा-3/निमगाव/ वनप्रस्ताव/मप्रवि/24 दि.14/06/2024 अन्वये सदर प्रस्ताव उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग, गोंदिया यांना सादर करण्यात आले होते. सदर पत्राचे अनुषंगाने राज्य शासनाचे पत्र क्र.Desk-17/FCA-S/PID-542/Nagpur/2024-25/1219 Date 14/08/2024 अन्वये अनुपालन अहवाल केंद्र शासनास सादर करण्यात आले आहे. परंतू सदर प्रस्तावावर पुनश्च मुददे उपस्थित करून केंद्र शासनाने दि.01/10/2024 च्या पत्रान्वये मुददयांचे अनुपालन करण्याबाबत कळविले.त्यात मुददा क्र. II मध्ये पर्यायी वनीकरणाकरिता एकुण 279 हेक्टर प्रस्तावित जमीनीपैकी 2 हेक्टर क्षेत्र अति घनदाट जंगल असून, 22 हेक्टर दाट जंगल, आणि काही भागामध्ये शेतीचे अतिक्रमण व वनीकरण असल्याचे नमुद करण्यात आले आहे. जेव्हा पर्यंत पर्यायी वनीकरणाकरीता योग्य जागा उपलब्ध होणार नाही. तेव्हा पर्यंत प्रकल्पास वन विभागाची अंतिम मान्यता मिळणार नसल्याचे कळविण्यात आल्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सदर योजनेचे काम तातडीने मार्गी लागावे याकरीता आढावा बैठक घेत सर्व पुर्तता करण्याच्या सुचना केल्या.