बंगाली बांधवांच्या अडचणी शासनस्तरावरून सोडविण्यासाठी वचनबद्ध:- आमदार राजकुमार बडोले

0
75

अर्जुनी-मोर- अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी नुकताच बंगाली वसाहतीचा दौरा केला.त्यानुसार  नियोजित दौर्‍यात अरुणनगर ता. अर्जुनी-मोर येथे भेट देऊन बंगाली बांधव व ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या व त्यावर त्वरित कार्यवाही करत काही मुद्दे मार्गी लावले. अर्जुनी-मोर. तालुक्यात असलेल्या संपुर्ण वसाहतीतील बंगाली बांधवांनी निवडणुकीत आपल्याला फार मोठे सहकार्य केले.त्या उपकाराची परतफेड करण्यास आपन वचनबद्ध आहोत.बंगाली समाजाच्या ज्या काही सार्वजनिक समस्या आहेत.त्या शासनस्तरावरून सोडविण्यास आपन कटीबध्द आहोत.सोबतच या वसाहतीतील सर्वांगीण विकासासाठी आपन अग्रही राहु असा विश्वास आमदार राजकुमार बडोले यांनी दिला.प्रामुख्याने अरुणनगर येथे मैदानासाठी जागा उपलब्ध करून देणे, सेवा सहकारी संस्थेसाठी कार्यालय मंजूर करणे, घरांच्या सनद वाटप आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.यासोबतच निर्माणाधीन मंदिराची पाहणी देखील करण्यात आली.या भेटीदरम्यान अरुणनगर च्या सरपंच मिन्नती कीर्तुनिया, राजहंसजी ढोके, माजी सरपंच बाबुल बनिक, प्राणगोपाल दास, प्रविण बिश्वास, बासुदेव बैन, जमिन मंडल आदी मान्यवर उपस्थित होते.