मतभेद विसरून सर्वांनी जिजाऊ रथयात्रेत सहभागी व्हावे :- सुनील तरोणे

0
41

अर्जुनी-मोर–स्वराज्य संकल्पक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे 12 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आगमन होणार आहे. या रथयात्रेत आपापसातील मतभेद विसरून सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री इंजि. सुनील तरोणे यांनी केले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील ग्रीन पार्क रेस्टॉरंट मध्ये आयोजित जिजाऊ रथयात्रेच्या नियोजन संदर्भातील बैठकीमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. लाखांदूर येथून रथयात्रेचे आगमन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथे सायंकाळी चार वाजता होणार असून अर्जुनी मोरगाव येथे महाराणा प्रताप चौकात सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. व नवेगाव बांध येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रथयात्रेच्या आगमना प्रित्यर्थ गावागावात सर्व शिवप्रेमींनी, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व नागरीकांनी उपस्थित राहुन ढोल ताशाच्या गजरात रथयात्रेचे स्वागत करण्याचे आवाहन सुनील तरोणे यांनी केले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष क्रांतीसिंह ब्राह्मणकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा संयोजिका सविताताई बेदरकर, सुनीताताई भेलावे, पद्मजा मेहेंदळे, प्रबोधनकार मुक्ताबाई हत्तीमारे, अनिल मुनेश्वर, प्रशांत गायधने, रामदास बोरकर, दादा संग्रामे, लोकपाल गहाणे, विजय डोये, चेतन डोये, होमदास ब्राम्हणकर, उद्धव मेहंदळे, कृष्णकांत खोटेले, प्रकाश शिवनकर, आरती चव्हाण, मंजू शिवणकर, प्रिया हरडे, तेजस्विनी पडोळे, सारिका रंगारी, मीनल टेंबरे, सुनीता ब्रम्हपुरे व इतर उपस्थित होते.