महाबोधी महाविहार बौद्धगया बिहार मुक्ती आंदोलनाचे समर्थनार्थ अर्जुनी मोर. येथे निघाला विराट मोर्चा

0
45

अर्जुनी-मोर.-बौद्धगया महाबोधी विहार ( बिहार ) हे जागतिक बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च असे स्थान आहे. तथागत गौतम बुद्धांना या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली. आणि म्हणूनच हे स्थळ बौद्ध अनुयायासाठी पवित्र स्थान मानले जाते. परंतु 1949 च्या बौद्धगया मंदिर व्यवस्थापन अधिनियमानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध धर्मीयांना संपूर्ण अधिकार नाही. हे महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात असावे या मागणीला घेऊन अर्जुनी मोरगाव येथे 7 एप्रिल रोजी विराट शांती मोर्चा काढण्यात आला. सदर शांती मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड प्रभाग क्रमांक 15 अर्जुनी मोर.ते तहसील कार्यालयापर्यंत विविध घोषणा देत काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयाचे पुढे  सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी भदंत नागसेन होते. यावेळी बौद्ध महासभेचे सोनदास गणवीर, अर्जुनी मोर पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार, गोवारी समाज संघटनेचे बालू नेवारे, दाणेश साखरे, यशवंत गणवीर, अनिल दहिवले, डॉ. भारत लाडे, आदिवासी संघटनेचे मुरारी पंधरे, शीलाताई उईके,पं.स.सदस्य भाग्यश्री सयाम, सविता कोडापे, नूतन दहिवले, नाना शहारे, श्रीकांत लोणारे, आर. के. जांभुळकर व मोरेश्वर धारगावे या मान्यवरासह विविध पक्षातील कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. बोधगया मंदिर व्यवस्थापन अधिनियम 1949 हे पूर्णपणे रद्द करण्यात यावे, आणि नवीन कायदा करून त्यामध्ये संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांकडे देण्यात यावे यासाठी या शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, हे आंदोलन आता जागतिक आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनाला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळत आहे. असेही यावेळी सभेत सांगण्यात आले, त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना देण्यात आले.

या मोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, बिरसा मुंडा सेवा समिती, आदिवासी महिला फेडरेशन तालुका अर्जुनी मोर, बामसेफ, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी व तालुक्यातील सर्व बौद्ध समाज तालुका अर्जुनी मोरगाव यांनी सहभाग घेतला होता