वर्धा,दि.०८ः समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झालीय. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. दुर्दैवाने यात तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे. काल (7 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.