गोंदिया,दि.०१ः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची सभा दि.26 एप्रिल 2025 रोजी संघटनेचे कार्यालय नविन प्रशासकीय भवन गोंदिया येथे पी.जी.शहारे अध्यक्ष जि.प.महासंघ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याच सभेत पेन्शन सह शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत चर्चा करून दि.20 मे 2025 रोजी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्म चारी महासंघाने देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंपात राज्य कार्यकारिणीच्या निर्णयानुसार जिल्ह्य़ातील सर्व कर्मचारी संपावर जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. आणि जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आलेली आहे. जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर वैद्य, कार्याध्यक्ष प्रकाश ठाकरे,कोषाध्यक्ष विश्वनाथ कापगते,सरचिटणीस लिलाधर पाथोडे, सहसचिव आशिष रामटेके, उपाध्यक्ष राकेश डोंगरे, जिल्हा संघटक रमेश नामपललीवार,निलेश बांते आणी इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.