गोरेगाव-. तालुक्यातील मोहाडी ते चोपा या तीन किमी रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्त्याचे अर्धवट काम करून सदर कंत्राटदाराने कामाकडे मागील दीड महिन्यांपासून पाठ फिरवून पसार झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी किती दिवस रस्त्याअभावी हाल सहन करावेत, हा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.
मोहाडी ते चोपा नव्हे तर, गोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत चालली आहे. परंतु, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी
मूग गिळून गप्प आहेत. परिणामी, परिसरातील मोहाडीपासून चोपापर्यंत गाव-खेड्यातील नागरिक, वाहनधारक, विद्यार्थी वर्गाला अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याचा, रस्त्यावरील खड्डे, तसेच चढ उताराच्या रस्त्याचा नाहक त्रास सहन
करावा लागत आहे. परिसरातील मोहाडी ते चोपासह, मोहाडी, आकोटोला, कनारटोला, चोपा अर्धवट बांधकाम झालेल्या रस्त्यावरील पडलेल्या भेदक खड्यांमुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून अर्धवट रस्त्याचे बांधकाम व गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे हे जशास तसे आहेत.
याकडे ना ठेकेदारांचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्या अधिकाऱ्याचे. याबाबत मागील एक महिन्यापासून मोहाडी ग्रामपंचायत सरपंचासह अनेक नागरिकांनी संबंधित
विभागाला वारंवार तक्रारी केल्या. थेट तालुक्याला जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यात गिट्टी, खड्डे, मुरुम, रस्त्याचा चढ-उतार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वाहनांचे वेळेपूर्वीच देखभाल दुरुस्तीचे काम करावे लागते. पर्यायी शारिरीक आरोग्यासोबतच अर्थिक तसेच मानसिकही नुकसान सहन करावे लागत आहे. अर्धवट रस्त्याचे त्वरीत काम पूर्ण करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्यासह ग्रामीण भागातील