
आमगांव- पोवार समाजाचे अस्तित्व व अस्मिता जनमाणसात टिकविण्यासाठी, पोवारी मायबोली जिवंत असने गरजेचे आहे. मायबोली जिवंत असल्यास साहीत्य निर्मिती होईल. साहीत्याचा प्रचार-प्रसार करून पोवार जातीची संस्कृती टिकेल. या संस्कृतीचा अंगीकार करून पोवार समाजाची अस्मिता व अस्तित्व राखले जाईल.
पोवार समाजातल्या लोकांनी शैक्षणिक व आर्थिक प्रगती करीत असतांना पोवारी संस्कृती स्विकारण्याच्या प्रवृत्तीकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनात येत आहे.
पोवार समाजाच्या पुर्वजांनी जतन करून ठेवलेली सुवर्णमय संस्कृती टिकविने समाज संघटणांसमक्ष मोठे आव्हान आहे. म्हणून मायबोली चे जतन करून साहीत्य निरंतर तयार करने व समाजा दरम्यान प्रसार-प्रचारीत करण्यासाठीच पोवारी साहित्य संमेलनाच्या निरंतर आयोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डाॅ.विशाल बिसेन यांनी केले.
ते पुढे म्हणाले पोवारी संस्कृती जतनाचे व्रत स्विकारणार्या नवोदित साहित्यकारकांनी, पोवारी बोलीतील आपले साहित्य मोठ्याप्रमाणावर तयार करीत जावे. प्रचार प्रसारांकरीता, साहित्यकारांना उर्जा देण्यासाठी तथा त्यांचा गुणगौरव करण्यासाठी, अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघ सदैव व्यासपिठ उपलब्ध करून देईल.
अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघ प्रणित राष्ट्रीय पोवारी साहित्य समिती च्या वतिने तथा माॅ. गडकालीका बहुउद्देशीय संस्था आमगांव व स्थानिक आयोजन समीतीच्या सहकार्यांनी आयोजित पाचव्या राष्ट्रीय पोवारी साहित्य संमेलन-2025 च्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
रविवार ता.11 मे रोजी या साहित्य संमेलनाचे आयोजन भवभूती महाविद्यालय बनगांव आमगांव येथे करण्यात आले होते.
साहीत्य संमेलनाचे आयोजन विविध सत्रात करण्यात आले होते.
साहीत्य संमेलनाचे उद्घाटन वरीष्ठ साहित्यिक व इतिहासकार प्राचार्य ओ.सी.पटले यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्य अतिथी म्हणून भवभूति महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद रहांगडाले तसेच प्राचार्य बेनेश्वर कटरे व स्वागताध्यक्ष इंजी. जयप्रकाश पटले यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय पोवारी साहित्य समितीचे अध्यक्ष इंजिनिअर गोवर्धन बिसेन यांनी प्रस्तावना प्रस्तुत करतांना सांगितले की, पोवारी बोली चे मुळ संस्कार ‘पोवार समाजाच्या सांस्कृतिक चेतने’ शी जुड़ले असून या सांस्कृतिक चेतनेचे पुनर्जागरण करण्यासाठी साहित्याच्या माध्यमाने जनसामान्य पर्यंत पोहचणे, भावी पिढ़ीला आपल्या मायबोलीच्या गौरवाची ओळख करून देणे आणि नविन साहित्यिकांना मंच उपल्बध करून त्यांना प्रोत्साहित करणे इ. उददेश्य समोर ठेवून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाची सुरूवात करण्यापूर्वी लक्ष्मी भजन मंडळ भजियापार (आमगांव) यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथ दिंडी व भवभूति महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोप करण्यात आले. यादोराव चौधरी, वर्षाबाई रहांगडाले, लक्ष्मी बाई येळे व ओमलताबाई पटले यांनी तयार केलेली पोवारी संस्कति चे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या वतिने अवलोकन करण्यात आले. ग्रंथदिंडीचे सूत्रसंचालन जेष्ठ साहित्यिक एड. देवेंद्र चौधरी यांनी केले.
संमेलनाची सुरुवात दीप प्रज्ज्वलित करून सरस्वती वंदना व गढ़कालिका मातेच्या आरतीने झाली. यावेळी राष्ट्रीय पाेवारी साहित्य समितीची ‘पोवारी साहित्य सुरभि’ स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. सोबत इतिहासकार ओ.सी. पटले यांची पोवारो का इतिहास’, हेमंतकुमार पटले यांची. ‘मायबोली’, शारदा चौधरी यांची ‘पोवारी पयचान’, वर्षा रहांगडाले यांची ‘गायखुरी’, यादोराव चौधरी यांची ‘बिह्या का नेंग-दस्तुर’, गोवर्धन बिसेन यांची ‘मयरी (दुसरी आवृत्ती)’’ यांचे सुद्धा विमोचन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे संचालन सौ. शारदा चौधरी व आभार भोजराज ठाकरे यांनी केले.
त्यानंतर महासंघ मध्यप्रदेशचे अध्यक्ष प्रा. प्रल्हाद पटले यांच्या अध्यक्षतेखाली काव्यपाठ सत्राचे आयोजन करण्यात आले. सुत्र संचालन उमेंद्र बिसेन व गुलाब बिसेन व आभार वर्षाबाई रहांगडाले यांनी केले.काव्यपाठात सहभागी कवि पुढिल प्रमाणे. यादोराव चौधरी, उमेंद्र बिसेन ‘’प्रेरित’, हेमंतकुमार पटले, इंजि. गोवर्धन बिसेन ‘गोकुल’, शारदा चौधरी, वंदना बिसेन ‘रामकमल’, डाॅ. हरगोविंद टेंभरे, पालिकचंद बिसने, आनंद सोनवाने, वर्षाबाई रहांगडाले, सौ.ओमलता पटले, गुलाब बिसेन, हिरदीलाल ठाकरे, गितकार रोशन रहांगडाले, प्रा. मोतीलाल बिसेन, बिरनबाई रहांगडाले, भागरताबाई कटरे, रुक्मिणीबाई ठाकरे, डी.पी. रहांगडाले, लक्ष्मीबाई येळे, सौ. बोपचे यांनी केले.
काव्यपाठमध्ये प्रथम पुरस्कार उमेंद्र बिसेन ‘प्रेरित’, द्वितीय पुरस्कार प्रा. मोतीलाल बिसेन व तृतिय पुरस्कार वंदना बिसेन ‘रामकमल’ यांनी प्राप्त केले.काव्यपाठाचे परीक्षण बॅरिस्टर वानखेडे शिक्षण महाविद्यालय नागपूर चे प्राचार्य तथा प्रसिध्द पोवारी साहित्यिक डाॅ. शेखराम येळेकर यांनी केले.
भोजन विश्रांति नंतर सेवानिवृत्त जिल्हा सहकार निबंधक तथा साहीत्य भारतीचे प्रांताध्यक्ष एड. लखनसिंह कटरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. सुत्र संचालन गुलाब बिसेन व आभार रोशन रहांगडाले यांनी केले.
परिसंवादाच्या “पोवारी संस्कृतिचे अस्तित्व, आवश्यकता व संरक्षण” या विषयाचे वक्ते महासंघाचे राष्ट्रीय सरंक्षक सदस्य मुन्नालाल रहांगडाले व कोमलप्रसाद रहांगडाले हे होते. तसेच “पोवारी साहित्य निर्मितीची आवश्यकता, संवर्धन आणि प्रचार-प्रसार” या विषयाचे वक्ते आयकर विभागाचे अप्पर आयुक्त ऋषि बिसेन (आय.आर.एस.) व बॅरि. वानखेडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखराम येळेकर हे होते.
शेवटचे समापन सत्र पोवार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सेवानिवृत्त प्राचार्य खुशाल कटरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. यात विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी स्व.हिरालालजी बिसेन यांना मरणोपरांत पोवार समाज रत्न सन्मान प्रदान करण्यात आला. स्व.मनराज पटले यांना मरणोपरांत पोवार समाज रत्न सन्मान प्रदान करण्यात आला. इंजिनिअर महेन पटले यांना पोवारी इतिहास शोध सन्मान प्रदान करण्यात आला हेमंतकुमार पटले यांना पोवारी कवि रत्न सन्मान प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी उत्कृष्ट पोवारी साहित्य पुरस्कारातंर्गत ॠषी बिसेन यांचे पोवारी संस्कृति(पोवारी कविता संग्रह), गुलाब बिसेन यांचे गावतर (पोवारी बाल कथा संग्रह), उमेंद्र बिसेन यांचे मायारू मोरी बोली (पोवारी कविता संग्रह), डॉ. प्रल्हाद हरिणखेड़े यांचे परी पोवारी (पोवारी कविता संग्रह) या साहित्यांची निवड करून पुरस्कृत करण्यात आले.सदर सत्राचे संचालन गुलाब बिसेन यांनी केले व सुरेंद्र पटले यांनी सर्वांचे आभार मानले.शेवटी संमेलनाची सांगता पोवारी पसायदान ने करण्यात आली.
संमेलनाच्या वरील सत्रात प्रमुख पाहूणे डी.पी.रहांगडाले, हिरदीलाल ठाकरे, डाॅ.हरगोविंद टेंभरे, हेमंतकुमार पटले, इंजिनिअर नरेश गौतम, CA प्रशांत बिसेन, मयुर बिसेन, विजय रहांगडाले, ऋषिकेश गौतम, दिलीप टेंभरे, सुनील तुरकर, धनराज भगत, डी.आय.कटरे विचार मंचकावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानीक आयोजन समीतीचे युमेश गौतम, सौ.उमाबाई बिसेन, सौ.ममताबाई रहांगडाले, सौ.रेखाबाई रहांगडाले, दिनेश चौधरी, शत्रुगन रहांगडाले, तेजलाल ठाकरे, लुकेश्वर परिहार, टेकचंद पटले ,तिरोडा महासंघाचे सचिव प्रा.संजय कटरे, सडकअर्जुनी महासंघाचे मार्गदर्शक लोकरामभाऊ येळे,प्राचार्य बेनेश्वर कटरे,शामराव ठाकरे,गोंदिया जिल्हा अध्यक्ष डी.आय.कटरे,सचिव रोषनकुमार रहांगडाले इत्यादी समाज कार्यकर्त्यांनी सहकार्य केले तथा भवभूती महाविद्यालय आमगांव प्रशासनानी साहित्य संमेलन आयोजनार्थ सहकार्य केले.