
पोलिस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश
पोहरा दि.२९-लाखणी तालुक्यातील पोहरा येथील शेतजमीनीचा वाद दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट असतान पोलीस अधीक्षक भंडारा यांना खोटा व दिशाभूल करणारा अहवाल पाठवून लाखणी पोलीसांनी दिशाभूल केली होती. या खोट्या अहवालावर विश्वास ठेवून पोलीस संरक्षण दिले होते.याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याने पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ माजली असून खोटा अहवाल पाठविणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
सुधीर हटनागर यांनी पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिलेल्या तक्रारीत पोहरा येथील भूमापन क्रमांक ४९०,५००, ५०१, ५३९, ५४२,५४४,५४६ या शेतजमीनीच्या नमुना सात बारा या सामुहिक अभिलेखावर वडील श्रीरामबापू गणपतबापू हटनागर यांचे दि. ८/१/२०१० निधन झाल्यानंतर फेरफार क्रमांक १०५६ अन्वये वारसान हक्काने त्यांच्या पश्चात एकूण ६ मुले व ४ मुलींचे दर्ज असलेले नाव नियमबाह्यपणे फेरफार क्र २८६६ अन्वये कमी केलेला आहे.
तथापि,दुय्यम निबंधक लाखनी यांच्याकडील दि.२३/७/२००८ च्या दस्त क्र.६६७/२००८ नुसार नोंदणीकृत मृत्युपत्रातील अज्ञान पालनकर्ता सुनील श्रीरामबापू हटनागर असताना नीलिमा सुनील हटनागर यांच्या नाव नियमबाह्यरित्या फेरफार क्र २८६६ अन्वये दर्ज केलेला आहे. या नोंदणीकृत मृत्युपत्रानुसार काका निलकंठ गणपतबापू हटनागर यांचे वारस म्हणून आनंद हटनागर व पारस हटनागर यांच्या दोघांच्या नावाची नोंद घेणे बंधनकारक होते.
मात्र, केवळ पारस हटनागर यांच्या एकट्याच्या नावाचा फेरफार क्र. २८६६ अन्वये नोंद घेतले असून अज्ञान पालनकर्ता निलीमा हटनागर यांची नोंद घेतली आहे. फेरफार क्र.२८६६ अन्वये श्रीरामबापू हटनागर यांचे पश्चात माझ्यासह एकूण ६ मुले व ४ मुलींचे दर्ज असलेले नाव कमी केले आहे. याबाबत मा. दिवाणी न्यायालय लाखनी येथे मा.क्र. R.C.S./9/2021 प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ही माहिती लपवून पोलिस स्टेशन लाखणी यांनी खोटा अहवाल पाठवून पोलीस अधीक्षक यांची दिशाभूल केली होती.
याबाबत चौकशीचे आदेश लाखणी पोलीसांत धडकले असून आता या गंभीर प्रकरणाकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करून चौकशीसाठी तक्रारदारास समजपत्र न देता पोलिस संरक्षण संदर्भात बोलाविण्यात आले असता आपण हजर झाले नाहीत व सदर जागेबाबत कुठलेही कागदपत्रे वेळेवर सादर केले नाही, त्यामुळे सदर जागेची मोजणी करिता अर्जदार यांनी मागणी केलेले संरक्षण बाबत अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालय भंडारा यांना पाठविल्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे यांनी प्रतिक्रिया दिली असून सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.