जि.प.बदल्यामध्ये पारदर्शकता?बदलीची फाईल सांभाळणारा १० वर्षापासून ठाण मांडून

0
2568

महिलेवर अन्याय,पती पत्नी एकत्रीकरणाचा फज्जा

गोंदिया,दि.०२ःगोंदिया जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या पारदर्शकपणे केल्याचा दावा करणारे प्रशासन तोंडघशी पडले की काय असे चित्र असून या सर्व बदल्यांची चौकशी विभागीय आयुक्तांनी करावी असा सुर आता दबक्या आवाजात येऊ लागला आहे.बदल्या करतांना नियमांना बगल दिले जात असल्याचे दिसून येत असून पती पत्नी एकत्रीकरणाच्या नियमातही सामान्य प्रशासन मनमानी करतांना दिसून येत आहे.तर दुसरीकडे आपल्याच कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडलेल्यांची बदली करण्याचे धाडस न दाखवता त्या कर्मचार्यामुळे जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासनच चालू शकत नाही असे समजून इतरावंर अन्याय करण्याचे काम होत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे आपल्या सोयीनुसार नियम तयार करुन अनधिकृत प्रतिनियुक्या करीत आहेत.त्यातच नुकत्याच झालेल्या बदली प्रकियेत एका महिला कर्मचारीवर सुध्दा अन्याय करण्यात आल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे या विभागात कर्मचारी बदलीची फाईल हाताळणारा संदिप इनवाते हा कर्मचारी स्वतःगेल्या १० वर्षापासून सामान्य प्रशासन विभागातच ठाण मांडून बसलेल्या या कर्मचार्याची विभाग बदली मुख्य कार्यकारी करतात काय,याकडे लक्ष लागले आहे.जणूकाही त्या कर्मचार्याशिवाय तो विभागच काम करु शकत नाही अशी धारणा या विभागातील अधिक्षक,सहा.प्रशासन अधिकारी व वरिष्ठांनी करुन टाकली की काय असे म्हणायची वेळ आलेली आहे.त्या इनवाते या

विशेष म्हणजे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगांनाथम यांची ओळख पारदर्शक म्हणून आहे.परंंतु त्यांच्याच कार्यकाळात बदल्या व प्रतिनियुक्त्यामध्ये घोळ होत असल्याचे दिसून येत आहे.८-१० वर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसणार्यांना त्या विभागातून हलविण्याएैवजी तिथेच ठेवायचे किंवा इतर विभागात बदलीचे आदेश काढून पुन्हा प्रतिनियुक्तीने आणायचे हा कार्यक्रम या जिल्हा परिषदेत राबविला जात असल्याने अनेक कर्मचारी न्यायापासून वंचित राहू लागले आहेत.पती पत्नी एकत्रीकरणांतर्गत ३० किमीच्या आत दोघांनाही ठेवावे असा नियम असताना एका महिला कर्मचार्यास सामान्य प्रशासन विभागातील एका कर्मचार्याकरीता सालेकसा येथे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.