
चित्रा कापसे/तिरोडा,दि.०९ः गोंदिया जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात योग शिक्षकांची अल्प मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती.त्या योग शिक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही या योग शिक्षकांच्या न्याय मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणीच तयार नसल्याने आता…आम्ही करायचे तरी काय अशा प्रश्न या योग शिक्षकांच्या मनात आलेल आहे.
शासन निधी उपलब्ध करुन देत नाही,म्हणून जिल्ह्यातील संपूर्ण योग शिक्षण बंद पडले आहे. त्यामुळे लहान मुलांना,नागरिकांना महिला वर्गाला योग शिक्षण देऊन योगासने कसे करावे व फायदा काय हे शिक्षक कोरोना काळात कुणीही कुणाला मदत करीत नव्हता तेव्हा यांनी जिवाची पर्वा न करता लोकांना योग शिक्षणाचे धडे दिले.लोकांना योग करून आपले शरीर निरोगी कसे करायचे यावर मार्गदर्शन केले, परंतु मागील सहा महिने झाले त्यांना मानधन मिळाले नाही, त्याच्या कुटूंबावर आर्थिक संकट आले आहे.त्यानी आपली व्यथा जिल्हा कार्यालय नवेझरी येथे भेट घेऊन प्रहार जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर याना सागितले.त्याची यासंदर्भातील आपली व्यथा प्रहारचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्याकडे मांडली.आणि त्यांच्यासबोत जिल्हा परिषद गाठले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन माहिती दिली त्यावर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटायला सांगितले.लगेच यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. योग शिक्षकांना मानधन देण्यात यावे व पुन्हा त्याना योग अभ्यासाकरीता नियुक्त करावे असे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी प्रहार जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर ,सुलोचना होरे,लक्ष्मी आबेडांरे,मेघा कन्हेवार,श्रद्धा देशमुख, श्रीलंका मेश्राम, तुप्ती ग्रेवाल,सौरभ बघेले,रविशंकर नागपुरे,पुस्तकला कटरे,देबीलाल कटरे अन्य योग शिक्षक उपस्थित होते.