34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ डाॅ.पी.के.पटले गोंदियाचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक

डाॅ.पी.के.पटले गोंदियाचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक

0
1772

blank

गोंदिया,दि.०९ : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमरिश मोहबे यांचे स्थानांतरण झाल्याने येथील पद रिक्त होते. दरम्यान आरोग्य विभागाने या पदावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पी. के. पटले यांची जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणून नियुक्ती केली आहे.डॉ. पी. के. पटले हे गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय अधिक्षक पदावर कार्यरत होते.त्या आदी डाॅ.पटले यांनी ब्रम्हपुरी,नागपूर सह नक्षलग्रस्त आदिवासी भागात सुध्दा आपली सेवा दिली असून आरोग्य विभागात उत्कृष्ठ सर्जन म्हणून त्यांची ओळख आहे. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना आरोग्य विभागाकडून पदोन्नती देण्यात आली. विनंतीपर डॉ. पी. के. पटले यांना गोंदिया येथील जिल्हा शल्यचिकीत्सक पदावर बढती देण्यात आली आहे.डाॅ.पटले हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रहिवासी आहेत.

blank