
नागपूर – नागपूरातील एका मेडिकल कॉलेजच्या पार्किंगमधील कारमध्ये एका वकीलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत अश्लील वर्तन करताना पोलिसांनी पकडले आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारच्या काचांना काळी फिल्म होती. पोलिसांना ही कार संशयित वाटली, त्यांनी कारचा थेट दरवाजा उघडला त्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांना पाहताच कारमधील युवती अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरुन धावत सुटली.अजनी पोलिसांनी संबधित वकिलाविरुध्द तसेच युवतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.