तिरोडा बस आगारात पाच नवीन बसचे लोकार्पण

0
43

तिरोडा,दि.१६ः तिरोडा बस आगारातील बसेस अत्यंत जुन्या असल्यामुळे नवीन बसेसची मागणी मागील अनेक वर्षापासून होती.त्या मागणीचा पाठपुरावा करीत आमदार विजय रहांगडाले यांनी अत्यंत लोकहिताचे काय करीत नविन ५ बसेस उपलब्ध करून दिल्या.त्या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार विजय रहांगडाले यांच्या शुभहस्ते पार पडला.सदर कार्यक्रमाला प्रादेशिक अभियंता नागपूर व अमरावती प्रदेश महेंद्र कुमार नेवारे ,विभाग नियंत्रक श्रीमती काळमेघ , यंत्र अभियंता (चालान) खवळे प्रमुख्याने उपस्थित होते.