29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ भारत राखीव बटालीयन येथे योग दिवस साजरा

भारत राखीव बटालीयन येथे योग दिवस साजरा

0
39

blank

गोंदिया,दि.22: भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15, बिरसी कॅम्प गोंदिया येथे समादेशक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लॅब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस गट मुख्यालयातील कवायत मैदानावर सकाळी 06 वा. उत्साहात साजरा करण्यात आला.

         सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटआस्थापनेवरील पोलीस निरीक्षक पवनप्रसाद मिश्रा यांनी केले. तसेच कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष पोमेंद्र कटरे, कोषाध्यक्ष किशोर पटले, सदस्य मुरलीधर माहोरे, दिपक कदम,  सुरेश बहेकार, दिलीप चौरागडे, योगशिक्षक राजेंद्र असाटी योगशिक्षीका माधुरी परमार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. योगशिक्षक श्री राजेद्र असाटी व योगशिक्षीका माधुरी परमार यांनी गटहजर असलेले 09 पोलीस अधिकारी व 103 पोलीस अंमलदार तसेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील एकूण 188 प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

         सदर कार्यक्रमाच्यावेळी  समादेशक अमोल गायकवाड, समादेशक सहायक श्रीकृष्ण गं. हिरपुरकर, पोलीस निरीक्षक एच. बी. कोळवते, पवनप्रसाद मिश्रा व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नारखेडे, बाबाराव राठोड, डी.एस. जगधने, नरेंद्र परिहार हजर होते. तसेच सदर कार्यक्रमाचे रुपरेषा व संपूर्ण तयारी पोलीस निरीक्षक पवनप्रसाद मिश्रा यांचे नियंत्रणाखाली गटाचे रक्षक जमादार असई रवीद्र बन्सोड, सपोहवा आशिष पाखमोडे, सपोहवा नागेश शेलोकर, सपोहवा विजय गौतम, सपोहवा प्रकाश तुरकर, सपोशि प्रशांत वैद्य, सपोशि जमीर शेख यांनी केली.