
गोरेगाव (प्रतिनिधी) — “एक पेड माॅ के नाम” या अभिनव उपक्रमांतर्गत पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मातेसम प्रेम व्यक्त करत तिच्या नावे एक झाड लावले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेमाचा भावही जपण्यात आला.कार्यक्रमामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यवेक्षक ए एच कटरे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना दरवर्षी एक झाड लावण्याचे व त्याचे पालनपोषण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. ए एस बावनथडे यांनी केले. शेवटी सर्वांनी झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.