36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ प्रहार संघटनेच्या वतीने २४ जुर्लेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

प्रहार संघटनेच्या वतीने २४ जुर्लेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

0
135

blank

तिरोडा,दि.२१:::राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा. तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी येत्या दि. 24 जुलै रोजी राज्यभर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा करत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्‍य सरकारला थेट इशारा दिला आहे.

  शेतकरी भुमीहिन मजूर, दिव्यांग बांधव,निराधार, विधवा महिला शोषित पिडीत कुटुंबातील आपल्या हक्काच्या मागण्या करीता पक्ष विरहित चक्काजाम आंदोलन मोठ्या ताकदीने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांंडारकर यांनी केले

शेतकर्याची संपूर्ण कर्ज माफी सात बारा कोरा,स्वांमीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करावी. हमीभाव.. व हमी भाव देऊ शकत नाही म्हणून पेरणी ते कापणी चे कामे नरेगा मधून लागु करण्याबाबत.दिव्यांग बांधव ६०००/- रुपये मानधन करावे.भुमीहिन मजूर पाच लक्ष विमा कवच व स्वतंत्र महामंडळ.धान उत्पादन बाकी शेतकऱ्यांना बोनस द्यावे.
क्रुषी पंपाचे डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विज कंनेक्शन द्या.धान ऊत्पादन शेतकऱ्यांना शोलर अट रद्द करा. नियमित चौविस तास विज द्यावे.शेतातील पिकांची वन्यप्राणी यांनी केलेली नुकशान भरपाई पुराने निकष बदलून त्या मधे वाढ करून नुकसान भरपाई द्यावे. शेण खताला सब सिडी द्यावे. रासायनिक खता प्रमाणे.तमाहिम सि.आर.पी./लेखापाल मानधन वाढ.अदानी पाँवर प्लांटची ओव्हर.लोड राख वाहतूक बंद करणे. संजय गाधी,श्रावण बाळ,योजना चे आदी मागण्यांचा समावेश आहे.

blank