38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी फुलविले शिवनी व तिगाव येथे हर्बल गार्डन

डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी फुलविले शिवनी व तिगाव येथे हर्बल गार्डन

0
496

blank

गोंदिया दि.23 :जिल्ह्यात सर्व आयुर्वेदीक दवाखान्यातुन आयुर्वेदिक औषधांचे व वनस्पतीचे जनतेपर्यंत ज्ञान पोहोचण्याकरता आयुर्वेदिक दवाखानामध्ये हर्बल बगीचा तयार करण्यात येत आहे.त्याचे उपयोग कसे करावे याबाबतचे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येते तसेच वृद्धांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येत असते.आमगाव तालुक्यातील शिवनी आयुर्वेदीक दवाखान्यातील आयुर्वेदीक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले यांची आयुर्वेदामधील अनुभव व्याप्ती, हर्बल गार्डनबाबतचे ज्ञान व कामाबाबतचा लगाव यामुळे त्यांनी आपल्या शिवनी आयुर्वेदीक दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव येथील प्रभार अशा दोन्हि ठिकाणी हर्बल गार्डन फुलवुन आरोग्य अधिकारी यांचे मनोबल उंचावुन जिल्ह्याची शान राखण्यात महत्वाची भुमिका राखली आहे.मुलांप्रमाणेच ते आपल्या हर्बल बगीचा वर प्रेम करित आहे.आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणे ते जबाबदारीने त्यावर ल्क्ष केंदीत ठेऊन त्याची निगा राखत असतात.

आपल्या आयुर्वेदीक दवाखान्यात वासा,गांडुची,तुळसी,बला,भुम्या की,ब्राम्ही,मंडुकपर्णी,  शतावरी,गुळवेल,कोरफड, ह्ळद,शुंठी,आमलकी,हरिंद्रा,अश्वगंधा,आद्रक(सुठ),आवला व एरंड सारखे  महत्वपुर्ण हर्बल वनस्पतीं लावले असुन आवश्यकतेपणे रुंग्णासाठी त्याचा लाभ देत असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.बाह्यरुग्ण ओपीडी मधील रुग्णांना त्याचं दैनदिन जीवनात कसा वापर करावाहे शिकविणे,त्यांना वनस्पती संवर्धन करण्याकरिता वनस्पती निःशुल्क देणे,ओपीडी मध्ये कोरफडचा वापर जळलेल्या ठिकाणी किंवा जखम करिता त्वरित आराम मिळावा याकरिता वापरणे,  निर्गुंडीच पानांचा वाफ संधिवात रुग्ण यांना देणेगुळवेल व भूम्यमलकीच काढा सर्व प्रकारचे तापात देणे,तुळस,आदरकव वासा पानांचा स्वरस खोकल्यासाठी देणेबला उत्तम वातनाशक असल्याने त्याचं तेल बनवून गुडघे दुखी रुग्णांना देणेअश्वगंधा मूल चूर्ण क्षय रुग्ण करिता उत्तम बल कारक असल्याने त्या रुग्णांना देतो. तसेच ही सर्व वनस्पती कोविड मध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेली व उत्तम रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आहेत,आवळाचा वापर ऍसिडिटी कमी करण्यासाठी व मधुमेहात साखरेच पातळी कमी करण्यास व प्रतिकार शक्ती वाढविण्यास होत असतोब्राम्ही,मंडुकपर्णी याच स्वरस च वापर स्मरण शक्ती वाढविण्यासतणाव कमी करण्यासाठी व रक्तदाब कमी करण्यासाठी वापरत असल्याची माहीती डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी दिली आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार देखील वाढू लागतात साथीच्या आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते.पावसाळ्यामध्ये लहान मुले आणि वृद्ध लगेच आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती गुणकारी आहेत.या वनस्पतींचा काढा प्यायला नंतर आरोग्य संबंधित अनेक समस्या दूर होतात.शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अतिशय प्रभावी मानली जाते.शरीराची डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी गुळवेल उपयुक्त आहे.स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पतीचे सेवन केले जाते.तुळस ही एक औषधी वनस्पती असून घरातील अंगणात तुळशीचे एक तरी रोप हे असतेच.शरीराचे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुळस गुणकारी आहे.आयुर्वेदामध्ये अश्वगंधा या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे ही आयुर्वेदिक वनस्पती तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करते तसेच अश्वगंधाचे सेवन केल्याने झोपे संबंधित समस्या दूर होतात.हर्बल वनस्पतीमध्ये अश्वगंध हा कुष्ठरोग,चिंताग्रस्त विकार, रक्तवाहिन्यासंबंधी रोग,संधिवात आणि सर्व प्रकारचे अशक्तपणासाठी शक्तीवर्धक म्हणून आणि जोम व चैतन्य निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.ब्राह्मी जो अपस्मार,वेडेपणा आणि स्मरणशक्ती नष्ट होणे यासारख्या मानसिक विकारांच्या उपचारांमध्ये वापरली जाते.जवस मध्ये रक्तदाब आणि लठ्ठपणा कमी करण्याची क्षमता असते.हळदीमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत आणि ते डीएनए परिवर्तन नोटेशन रोखू शकतात.याव्यतिरिक्त त्यात अँटीसेप्टिक आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म देखील आहेत.सांधेदुखी बरा करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

औषधी वनस्पती सामान्यतः रक्तदाब कमी होणे,हृदयी व रक्तवाहिन्यासंबंधी रोग रोखणे किंवा कर्करोगाचा धोका कमी करणे असे अनेक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.जैवविविधता सुधारणा व्यतिरिक्त ही झाडे ऑक्सिजनची पातळी वाढवण्यात आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करतात.लोकांनी आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत हर्बल गार्डन लावुन आपले आरोग्य सुदृढ् ठेवण्याचे आवाह्न त्यांनी केले आहे.

blank