31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात ५ आँगस्टला मंडल यात्रेचे आगमन

गोंदिया जिल्ह्यात ५ आँगस्टला मंडल यात्रेचे आगमन

0
66

नवेगावबांध व आमगाव येथे होणार ओबीसी जनजागरण मेळावा
७ आँगस्टला भंडारा येथे समारोप
-युवक,विद्यार्थ्यामंध्ये अधिकार आणि कर्तव्याप्रती करणार जागृती

गोंदिया: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघणार आहे.ही यात्रा २ आँगस्टरोजी नागपूरातील सविंधान चौकातून रवाना होणार आहे.हि मंडल यात्रा ५ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे सांय.४ वाजता दाखल होणार आहे.त्याच दिवशी सायकांळी ५ वाजता नवेगावबांध येथील ग्रीनपार्क येथे जनजागृती मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तर ६ आँगस्टला आमगाव येथे सायंकाळी ५ वाजता ओबीसी,एस्सी एस्टी जागरण मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या मंडल यात्रेच्या गोंदिया जिल्ह्यातील कार्यक्रमासंबधाने  २७ जुर्लेला शास्त्रीवार्डातील चुटे भवन येथे ओबीसी संघटनाची बैठक पार पडली.या बैठकीत मंडल यात्रा यशस्वी करण्याच्या उद्देशाने नियोजन करण्यात आले.सोबतच ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश तातडीने सुरु करणे आणि वसतिगृहाकरीता गोंदिया शहरात जागेचा शोध घेणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.बैठकीला ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे उपाध्यक्ष सी.पी.बिसेन,संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे रवी अंबुले,प्रमोद बघेले, ओबीसी अधिकार मंचचे कैलास भेलावे,युवा बहुजन मंंचचे सुनिल भोंगाडे,रवी भांडारकर,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेमलाल साठवणे,ओबीसी सेवा संघाचे डाॅ.भुमेश ठाकरे,डाॅ.डी.पारधी,नरेश परिहार,सुनिल कुंभलकर,एस.एम.चित्रीव,उमेश कटरे,भुमेश शेंडे आदी ओबीसी बहुजन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपायावर चर्चा, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जागृती, ओबीसींचे वसतिगृह, महाज्योती आणि ओबीसी आर्थिक विकास महामंळाच्या योजना, शिष्यवृत्तीचा लाभ, ओबीसींची जनगणना तसेच यात्रेच्या माध्यमातून ओबीसी हितासाठी गठित बी.पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची माहिती ओबीसी समाजाला देऊन या शिफारशी आज परिस्थितीत शासनाने लागू करण्याची आवश्यकता या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.यात्रेचा भंडारा येथे ७ आँगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे..या यात्रेच्या यशस्वीतेसाठी ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी अधिकार मंच,संघर्ष वाहिनी,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संविधान मैत्री संघ,भारतीय पिछडा शोषित संघ, स्टु़डटंस राईटस असो.,युवा बहुजन एकता मंंच सर्व समाज ओबीसी मंच,आता लढूया एकीनेच सारख्या अन्य बहुजन ओबीसी संघटनांचा सहभाग राहणार आहे.