
गोंदिया,दि.३०ः राज्य सरकारची अनुसूचित जमाती कल्याण समिती गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी घटकांच्या उपायोजनासह इतर बाबींचा आढावा घेण्याकरीता दाखल झाली आहे.त्यानिमित्ताने गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती श्रीमती पूजा अखिलेश सेठ(धुर्वे)यांनी समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेत समाजकल्याण विभागातील अडीअडचणीवर चर्चा केली.यावेळी श्रीमती पूजा सेठ (धुर्वे) यांनी
अनुसूचित जमाती घटकातील शिक्षक,विद्यार्थी व महिलांचे विषय मांडले.सोबतच जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व राज्यसरकारच्या समाज कल्याण विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने योजनाच्या अमलबंजावणीत अडचणी येत असल्याचे सांगितले.कमी कर्मचारी व अधिकारी वर्गामुळे जात प्रमाणपत्र, validity तयार होण्यास उशीर असल्याचेही निदर्शनास आणून दिले.





