गोंदिया,दि.३१ः रामनगर (बगीचा) येथील निवासस्थानी श्री कृष्ण गोरक्षण सभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकरलाल अग्रवाल यांनी वर्षाताई प्रफुल पटेल यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.या प्रसंगी वर्षाताई प्रफुलभाई पटेल यांनीही अग्रवाल यांचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन व सत्कार केला.यावेळी भय्यो चौबे, राम अग्रवाल, दिनेश अग्रवाल (मिर्ची), राजेश व्यास, शैलेश अग्रवाल, अजीत सिंह, राम अग्रवाल (साजन) आदी मान्यवर उपस्थित होते.





