31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यक सभा शनिवारला दु.३ वाजता

गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यक सभा शनिवारला दु.३ वाजता

0
44

गोंदिया,दि.३१ः- गोंदिया तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची आवश्यक बैठक 02 ऑगस्ट 2025 शनिवारला दुपारी 3.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे आयोजीत केली आहे. या बैठकीला माजी आमदार राजेन्द्रजी जैन यांच्या अध्यक्षतेत, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, विनोद हरीनखेडे, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, किशोर तरोणे, गणेश बरडे, केतन तुरकर, अविनाश जायस्वाल, अजय गौर, डी .यु .रहांगडाले, टी .एम.पटले, मोहन पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली आहे.तरी गोंदिया तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, युवती राष्ट्रवादी काँग्रेस, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी सेल, किसान सेल, डॉक्टर सेल, सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस सहित सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तां, ग्रामपंचायत व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी न चुकता सभेला उपस्थित राहण्याचे आव्हान गोंदिया तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली आहे.