33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पहिल्या चिक दुधातून मिळणारे पोषण घटक आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

पहिल्या चिक दुधातून मिळणारे पोषण घटक आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

0
65

blank

जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रम बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय येथे संपन्न

2025 ची थीम: ” स्तनपानात गुंतवणूक म्हणजे भविष्याची गुंतवणूक “– डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा शल्यचिकीत्सक

गोंदिया,दि.०२- जागतिक आरोग्य संघटनेने 1990 पासुन दि.1 ते ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणुन साजरा करण्यास सुरवात केली.सदर सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करुन लोकांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात येत असते. जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे उदघाटन बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हारबाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवन राऊत,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.नीतिका पोयाम,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.जयस्वाल,बालरोग तज्ञ डॉ.सचिन उईके,स्त्रीरोग तज्ञ डॉ.बागडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा  हुबेकरडॉतुरकरसमन्वयक पारस लोणारे,आहार तज्ञ स्वाती चव्हाण,अजित सिंग,स्टाफ नर्स प्रकृती चव्हाण, योगेश्वरी पवार,अमिता पिल्लेवान,अहिर,सोनल मानकरअक्षता राऊतदिपाली पानतावणे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील स्तनदा माता यांना आईचे दूध हे बाळासाठी जणू अमृतच असते.नवजात बाळाला मात्र सुरुवातीपासूनच स्तनपान करविणे हे बाळासाठी एक नैसर्गिक वरदान आहेनव्हे बाळासाठी ते जीवनामृत आहे.नवजात बाळाला स्तनपान करणे ही एक आवश्यक बाब आहे.बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अत्यंत गरजेचे व उपयुक्त असते.आईच्या दुधात जे सामर्थ्य आहे ते जगातील कोणत्याही घटकात नसल्याचे स्पष्ट केले तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोल्हार यांनी नवजात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये मातेच्या दुधात समाविष्ट असतात.त्या दुधात बाळाच्या रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी उपयोगी घटक असतात.म्हणूनच मातेचे दूध हे बाळासाठी संपूर्ण आहार आहे.त्यामुळे बाळाचा विविध आजारांपासून बचाव होत असल्याची माहीती यावेळी दिली.दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत एक थिम देवुन स्तनपानाविषयी जनमाणसात जनजागृती केली जाते.वर्ष 2025 मध्ये “स्तनपानात गुंतवणूक म्हणजे भविष्याची गुंतवणूक”ह्या थिमने स्तनपानामुळे केवळ मुलांसाठीच नाही तर समाजासाठी आशादायक भविष्य मिळते.यामुळे आरोग्यसेवेचा खर्च कमी होतोसंज्ञानात्मक विकास वाढतोअर्थव्यवस्था मजबूत होते आणि मुलांना निरोगी सुरुवात मिळत असल्याची भावना निर्माण होत असयाची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी यावेळी दिली.बालरोग तज्ञ डॉ.सचिन ऊईके यांनी बाळ जन्मल्यानंतर लवकरात लवकर मातेचा व बाळाच्या त्वचेला एकमेकाला स्पर्श करावा.व एका तासाच्या आत स्तनपानाची सुरुवात करावी पहिल्या एका तासापासूनच त्याला आईचे दूध देणे आवश्यक ठरते.त्या चिक दुधातच रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी लागणारे उपयोगी घटक असतात.सहा महिन्याच्या आतील बाळाला निव्वळ स्तनपान सुरू ठेवावे.निदान दोन वर्ष आईच्या दुधासोबत पूरक अन्न त्याला मिळायला हवे तर त्याची सुदृढ वाढ होत असल्याची माहिती यावेळी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वितरित करण्यात येऊन स्तनपान विषयीचे पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले तसेच बॅनर व पोष्टरच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.

स्तनपानाचे मातांना होणारे फायदे: –

1) स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते.

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माता आपल्या नवजात बालकाला पुरेसे स्तनपान करू शकत नाहीहे वास्तव आहे. परंतुज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते.गर्भधारणेच्या तसेच स्तनपानाच्या काळात स्तनातील पेशींमध्ये बदल होत असतात.या पेशींमधील बदलामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी होते.

2) बाटलीने दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणार्याँ मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास तसेच गर्भधारणे आधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते.

गर्भवती मातांचें शरीर हे गर्भधारणेच्या काळात अधिकाधिक चरबी साठवून ठेवत असते.कारण शरीरामध्ये दूध निर्माण होण्याच्या कालावधीमध्ये जास्त कॅलरीज साठवून ठेवण्याची गरज असते. अशा वेळी स्तनपान करणाऱ्या मातांना त्यांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अधिक मदत होते.याउलट बाटलीने दूध भरविणाऱ्या मातांच्या संदर्भात हे प्रमाण कमी आहे.

3)  आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास मदत: –

स्तनपानावेळी आई आणि बाळामधील अंतर हे सर्वात कमी असते.मूल हे आईच्या इतके जवळ असते की ते सहज आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ओळखू शकते. प्रक्रियेतून बाळामध्ये शांती आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागते.स्तनपान करताना संप्रेरकांमध्ये होणारे बदल हेसुद्धा आई आणि बाळ यांच्या नात्यात दृढता आणणारे ठरतात.ऑक्सिटोसिन हे एक प्रेम वाढवणारे संप्रेरक असूनयामुळे स्तनपान करणाऱ्या माता आणि त्यांचे मूल यांच्यामध्ये एक उच्चपातळीचे भावनिक संबंध करण्यास मदत करत असल्याचे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी म्हटले आहे.

स्तनपानामुळे बाळांना होणारे फायदे:

स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोतम पेय आहे.हे दूध म्हणजे जीवनसत्वप्रथिनेआणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते.त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये असतात.ज्यामुळे बाळाच प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गापासूनअॅलर्जी यासारख्या रोगांचा प्रतिकार करणे शक्य होते तसेच या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता फार कमी होते. स्तनपानामुळे मुलांच्या मेंदुचा विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमताही उंचावते. स्तनपान हे अर्भकाच्या विकासातील सर्वोत्तम दुवा ठरते.

                               –  डॉ.पुरुषोत्तम पटले , जिल्हा शल्यचिकीत्सक

blank